युक्रेनचे नाटो देशांवर घणाघाती आरोप; म्हटले रशियाविरोधी युद्धात आम्हाला एकटं पाडलं...

Russia-Ukraine invasion latest news: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Zelenskiy ) यांनी नाटो देशांवर जोरदार आरोप केले आहेत. 

Updated: Feb 25, 2022, 01:10 PM IST
युक्रेनचे नाटो देशांवर घणाघाती आरोप; म्हटले रशियाविरोधी युद्धात आम्हाला एकटं पाडलं... title=

कीव Russia-Ukraine Conflict: : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाटो देशांवर जोरदार आरोप केले आहेत. रशियाविरोधातल्या युद्धात युक्रेनला एकटं पाडल्याचं झेलेन्सकी म्हणाले. 

भीतीपोटी युक्रेनला नाटोत सहभागी केलं नाही असा आरोपही त्यांनी केला. तर देशातल्या सायबर हॅकर्सनं सहकार्य करावं रशियन सैन्याची हेरगिरी करावी असं आवाहन त्यांनी केलंय. 

युक्रेनवर रशियाने मोठं आक्रमण केलं तरीही, अद्यापर्यत कोणत्याही नाटो संघटनेतील देशाने युक्रेनच्या मदतीत थेट पाऊल उचलेलं नाही. त्यामुळे रशियाच्या युद्धात युक्रेनच्या शहराचे मोठं नुकसान झालं आहे. 

 रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेनं रशियात सैन्य पाठवण्यास नकार दिला आहे. रशियाची कोंडी करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी रशियावर आर्थिक निर्बध लादलेत. (Big US announcement in the wake of the Russia-Ukraine war, The United States has refused to send troops into Russia)

तसेच G7 च्या नेत्यांची भेट घेऊन अमेरिका आपल्या मित्र राष्ट्रांसह रशियावर कठोर निर्बंध लादणार असल्याचे सागितले आहे. जर रशियाने अमेरिकेवर सायबर हल्ला केला तर त्याला अमेरिका चोख उत्तर देईल असा इशाराही बायडन यांनी दिला आहे. 

रशियाविरोधातल्या युद्धात युक्रेनला एकटे पाडले गेले आहे. याबाबतचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे. भीतीपोटी युक्रेनला नाटोत सहभागी करण्यास नकार दिला आहे. झेलेन्स्की यांनी नाटो देशांवर सडकून टीका केली आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाटो देशांवर मोठा आरोप केला आहे. रशियाविरोधातल्या युद्धात युक्रेनला एकटं पाडल्याचे झेलेन्सकी म्हणाले. भीतीपोटी युक्रेनला नाटोत सहभागी केले नाही, असा आरोपही त्यांनी केला. तर देशातल्या सायबर हॅकर्सने सहकार्य करावे रशियन सैन्याची हेरगिरी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.