Bungee Jumping : बंजी जंपिंग करताना कड्यावरुन उडी मारली आणि मध्येच दोर तुटला; काळजाचा ठोका चुकवणारा Video

आयुष्यात एकदा तरी बंजी जंपिंगचा (Bungee Jumping) थरारक अनुभव घ्यावा असे अनेकांना वाटते. मात्र, बंजी जंपिंग करताना एका महिलेला अत्यंत भयानक अनुभव आला आहे. याचा  video viral झाला आहे.  

Updated: Feb 4, 2023, 09:22 PM IST
Bungee Jumping : बंजी जंपिंग करताना कड्यावरुन उडी मारली आणि मध्येच दोर तुटला; काळजाचा ठोका चुकवणारा Video title=

Bungee jumping Accident Video : सध्या बंजी जंपिंग (Bungee Jumping), पॅराग्लायडिंग (Paragliding), स्कूबा डाइविंग(scuba diving) या सांरख्या साहसी खेळांची क्रेज वाढत आहे. हे खेळ खेळता सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेतली जाते. मात्र, असे असताना बंजी जंपिंग करतान थरारक घटना घडला आहे. बंजी जंपिंग करताना कड्यावरुन उडी मारली आणि मध्येच दोर तुटते. काळजाचा ठोका चुकवणारा हा Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Vicious Videos  नावाच्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 12 लाख पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. 15 हजार पेक्षा अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. तर, या व्हिडिओवर 500 पेक्षा अधिक कमेंट्स आल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहे. 

एका बंजी जंपिंग  स्टेशनवरचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेला क्लपनाही नव्हती की तिच्यासोबत काय घडणार आहे. ही महिला मोठ्या धाडसाने बंजी जंपिंग साठी तयार येते. बंजी जंपिंग  स्टेशनवरचे गार्ड या महिलेला सेफ्टी बेल्ट बांधून बंजी जंपिंगसाठी तयार करतात. यानंतर ते तिला कड्यावरुन ढकलून देतात. 

उंच कड्यावरुन  थेट नदी पात्रात झेपावणाऱ्या बंजी जंपिंगचा थरार अनुभव या महिलेसाठी अत्यंत भयावह ठरला आहे. कारण या महिलेने बंजी जंपिंगसाठी कड्यावरुन खाली ठकलल्यानंतर महिला वाऱ्याच्या वेगाने नदी पात्राकडे झेपावते. मात्र, मध्येच  बंजी जंपिंग करण्यासाठी महिलेला बांधण्यात आलेला सेफ्टी दोर तुटल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येत आहे. या महिलेनेचे पुढे काय झाले हे नेमकं समजू शकलेलं नाही. ऐवढ्या उंच कड्यावरुन पडल्यावर कोण जिवंत राहील, या महिलेचा मृत्यू झाला असावा, हा व्हिडिओ खरोखरच अत्यंत खरतनाक आहे अशा प्रकारच्या कमेंट या व्हिडिओवर आल्या आहेत. या व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.