क्लर्कच्या एका चुकीमुळं तो झाला करोडपती; 60 वर्षांच्या वृद्धाचे नशीब फळफळले

Trending News In Marathi: क्लर्कने केलेल्या एका चुकीमुळं एक व्यक्ती मालामाल झाला आहे. त्याने चक्क करोडो रुपयांची रक्कम जिंकली आहे. नेमकं काय झालं जाणून घेऊया. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 28, 2023, 11:45 AM IST
क्लर्कच्या एका चुकीमुळं तो झाला करोडपती; 60 वर्षांच्या वृद्धाचे नशीब फळफळले title=
Retailer mistake leads to old man winning 25000 dollar lottery

Trending News In Marathi: झटपट श्रीमंत होण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात. अनेकजण पैसे कमवण्यासाठी वेगळे मार्ग पत्करतात. तर, काही त्यांच्या नशीबावर अवलंबून असतात. तर, काही जणांचा नशीबावर इतका विश्वास असतो कधी कधी तो विश्वास सार्थ ही ठरतो. पैसे कमावण्यासाठी एकाने लॉटरीचे तिकिट खरेदी केले अन् त्यानंतर जे झाले त्याने त्याचे नशीबच फळफळले आहे. 

अमेरिकेतील इलिनोइसमध्ये राहणाऱ्या मायकल सोपेजस्टलसोबत एक चक्रावणारी घटना घडली आहे.  त्याने लॉटरीचे तिकिट खरेदी केले आपल्याला इतक्या मोठ्या रकमेची लॉटरी लागेल याची त्याला जराही खात्री नव्हती. पण क्लार्कच्या एका चुकीने त्याचे नशीब फळफळले आहे. नेमकं काय घडलं हे मायकल याने सांगितले आहे. 

मायकलने म्हटलं आहे की, तो नेहमीच त्याच्या मिशिगन येथील आवडीच्या रेस्तराँमध्ये महिन्यातून एकदा जातो. तिथे गेल्यावर तो लकी फॉर लाइफ या लॉटरीचे तिकिट खरेदी करतो. 17 सप्टेंबर रोजी तो गोलो गॅस स्टेशनसाठी लॉटरी विक्रेत्याने चुकून एकही ड्रॉसाठी 10 लाइन असलेले तिकिट प्रिंट करुन दिले. असं असतानाही त्याने त्या विक्रेत्याकडून ते लॉटरीचे तिकिट खरेदी केले. 

त्यानंतर जेव्हा तो घरी गेला तेव्हा काहीच दिवसांत त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तो ज्या लॉटरीला क्लार्कची चूक समजत होता. त्यामुळंच त्यांचे नशीब चमकले आहे. मायकलने तिकिट चेक केल्यानंतर आयुष्यभरासाठी त्याला 25,000 डॉलरची लॉटरी लागली आहे. ही रक्कम बघूनच तो हैराण झाला. क्लार्कच्या एका चुकीमुळं तो इतकी मोठी लॉटरीची किंमत जिंकू शकला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मायकल लगेचच लॉटरीच्या कार्यालयात रक्कम घेण्यासाठी पोहोचला. तिथे त्याने वर्षभर 25,000 डॉलर घेण्याऐवजी एकदाच  390,000 डॉलर (3.25 कोटी) घेण्याचा पर्याय स्वीकारला. इतक्या मोठ्या रकमेचे काय करणार असा प्रश्न विचारला असता मायकलने लगेचच उत्तर दिलं आहे. तो लॉटरीच्या पैशांचा वापर तो ट्रॅव्हलिंगसाठी करणार आहे. तसंच, उरलेले पैसे बचत करण्याची योजना आखत आहे.

दरम्यान, लकी फॉर लाइफ ही योजना बारा राज्यांबरोबरच वॉशिंगट्न, डी.सीमध्ये आयोजित केली जाते. या अंतर्गंत लॉटरी जिंकलेल्या व्यक्तीला $3 पासून ते आयुष्यभरासाठी रोज $1,000 रुपयांपर्यंतचे बक्षीस लागते. प्रत्येक लॉटरीचा निकाल कंपनीच्या वेबसाइटवर सांगितला जातो.