Chandrayaan-3 : भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेवर सर्व जगाचं लक्ष आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिग केले. यांनतर चांद्रयान 3 ला चंद्रावर भूंकपाचे धक्के जाणवले. चंद्रावर आलेल्या भूकंपाचं रहस्य उलगडलं आहे. चंद्रावर आलेल्या भूकंपाबाबत संशोधकांनी धक्कादायक माहिती दिली आहे.
चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले. यानंतर विक्रम लँडरच्या मदतीने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरुन संशोधन केले. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर संशोधन करत फिरत असताना चंद्रावर कंप जाणवले होते. प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर आलेल्या भूकंपाची नोंद केली होती. प्रज्ञान रोव्हरवर असलेल्या लुनार सिस्मिक अॅक्टिव्हिटी (ILSA) पेलोडद्वारे त्याची नोंद करण्यात आली होती.
प्रज्ञान रोव्हर आणि इतर पेलोड्सनेही यासंबंधीचा डेटा पाठवला होता. इस्रोने ट्विट करत चंद्रावरील भूंकंपाची माहिती जाहीर केली होती. आता मात्र, चंद्रावर येत असलेले भूकंप नैसर्गिक नसल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. 51 वर्षापूर्वी चंद्रावर कोसळल्या Apollo 17 या यानामुळे चंद्रावर भूंकप येत असल्याचा खुलासा झाला आहे.
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून धक्कादायक खुलासा केला आहे. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे भूभौतिकशास्त्रज्ञ अॅलन हसकर यांच्या टीमने चंद्रावर येत असलेल्या भूंकपाबबात काही निरीक्षणे नोंदवली आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर आजपर्यंत भूकंप सदृष्य हजारो हादरे बसले आहेत. हे सर्व भूंकप चंद्रावर 51 वर्षापूर्वी चंद्रावर कोसळलेल्या Apollo 17 या यानाच्या अवशेषामुळे येत आहेत.
डिसेंबर 1972 मध्ये अपोलो 17 हे यान प्रक्षेपित करण्यात आले. यावेळी NASA अंतराळवीर जीन सेर्नन आणि हॅरिसन श्मिट चंद्रावर उतरले. याच यानाच्या अवशेषामुळे चंद्राचा पृष्ठभाग कंप येत आहेत. ऑक्टोबर 1976 ते मे 1977 दरम्यान हे यान पुन्हा सक्रिय झाले. या यानामुळेच टंद्रावर कंपने येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. चंद्रावर दिवसा 120 अंश सेल्सिअस तर रात्री -130 अंश सेल्सिअस असे तापमान असते. दिवसा उष्णतेमुळे अपोलो 17 यानाच्या सक्रिय भागांमुळे चंद्रावर हादरा बसेल अशी कंपने येत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. चंद्रावर पडून असलेल्या या अपोलो 17 यानाच्या मदतीने नासा पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवणार आहे.