बिकनी गर्ल्सने घेरलेल्या इस्लामिक धर्मगुरूला 8000 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

बापरे! 'या' इस्लामिक धर्मगुरूला 8000 वर्षांची शिक्षा का सुनावलीय? काय आरोप आहेत? 

Updated: Nov 18, 2022, 06:41 PM IST
बिकनी गर्ल्सने घेरलेल्या इस्लामिक धर्मगुरूला 8000 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा title=

तुर्कस्तानमध्ये राहणाऱ्या एका 66 वर्षीय इस्लामिक धर्मगुरूला 8 हजार 658 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा धर्मगुरू टीव्हीवरून (Adnan Oktar) अनुयायांना धार्मिक प्रवचन द्यायचा.मात्र आता त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याने अनुयायांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान हा धर्मगुरु कोण आहे? व कोणत्या आरोपाखाली त्याला इतक्या वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे, हे जाणून घेऊयात.

इस्तांबूलमध्ये राहणाऱ्या धार्मिक नेत्याचे नाव अदनान ओक्तार (Adnan Oktar) आहे. अदनान टीव्हीवर इस्लामिक प्रवचन देत असे. यावेळी त्यांच्या आजूबाजूला अनेक बिकनी गर्ल्स बसलेल्या असायच्या.तो इतरांना उपदेश द्यायचा मात्र तो स्वतः महिलांसोबत आक्षेपार्ह कृत्ये करायचा. तसेच देशातल्या इतर धर्मगुरूंनीही त्यांच्यावर अनेकदा टीका देखील केली होती.

आरोप काय? 

एका महिलेने न्यायालयात अदनानने (Adnan Oktar) तिच्यावर आणि इतर अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता.तिला गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास भाग पाडल्याचेही तिने सांगितले आहे. अदनानच्या आश्रमात महिलांना सेक्स स्लेव्हप्रमाणे ठेवले जात होते. तपासादरम्यान पोलिसांना अदनानच्या घरातून 69,000 गर्भनिरोधक गोळ्या सापडल्याची माहिती आहे. 

 8 हजार 658 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ?

दरम्यान लहान मुलांचे लैंगिक शोषण, बलात्कार, फसवणूक, राजकीय आणि लष्करी हेरगिरी या गुन्ह्यासाठी त्याला 8 हजार 658 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी यापूर्वी त्याला 1075 वर्षे तुरुंगवास झाला होता, मात्र बुधवारी न्यायालयाने हा निकाल रद्द करत त्याच्या शिक्षेत वाढ केली. आता त्याला 8 हजार 658 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

या प्रकरणात 16 नोव्हेंबर 2022 रोजी इस्तांबूल न्यायालयाने अदनानला (Adnan Oktar) लैंगिक गुन्ह्यांसह इतर आरोपांसाठी 8 हजार 658 वर्षांची शिक्षा सुनावली. अदनान ओक्तार आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पहिला निकाल जानेवारी २०२१ मध्ये सुनावण्यात आला.