धक्कादायक ! एसी कोचमध्ये तरुणीवर टीसीसह तिघांकडून बलात्कार

धावत्या ट्रेनमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आले आहेत.

Updated: Jun 1, 2022, 04:28 PM IST
धक्कादायक ! एसी कोचमध्ये तरुणीवर टीसीसह तिघांकडून बलात्कार title=

कराची : पाकिस्तानात एका तरुणीवर चालत्या ट्रेनमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. तिकीट चेकरने तरुणीला एसी कोचमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर इतर दोन कर्मचाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केलीये. पोलिसांनी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची पुष्टी केली आहे.

पाकिस्तान रेल्वेच्या प्रवक्त्यांनी माहिती देताना म्हटले की, 28 मे रोजी एक तरुणी मुलतानहून कराचीला जाणाऱ्या बहुद्दीन झकेरिया एक्सप्रेसमध्ये प्रवास करत होती. त्यानंतर तिकीट चेकरसह 3 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

एसी कोचमध्ये नेऊन सामूहिक बलात्कार

महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, ती जनरल डब्यातून प्रवास करत होती. त्यानंतर तिकीट चेकरने तिला एसी कोचमध्ये बसण्याची ऑफर दिली. जिथे तिकीट तपासनीस आणि इतर कर्मचाऱ्यांनी तिच्यासोबत बलात्कार केला. महिलेने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तिला धमकावण्यात आले.

तरुणीने कराची गाठून तक्रार केली. यानंतर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार केली. यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. त्याचवेळी पोलिसांनी वैद्यकीय अहवालाच्या आधारे मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची पुष्टी केली आहे. बहूद्दीन एक्स्प्रेस चालवण्याची जबाबदारी एका खासगी कंपनीकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी एकाच खासगी कंपनीचे कर्मचारी आहेत.

ही महिला कराची येथील रहिवासी आहे. नुकताच तिच्या पतीने तिला घटस्फोट दिला. मुलांना भेटण्यासाठी ती मुझफ्फरगडला गेली होती. 28 मे रोजी ती कराचीला परतत असताना ही घटना घडली.