मुंबई : जपानची राजकुमारी माको हिने तिच्या प्रेमासाठी शाही परिवार नाकारला आहे. तिने केई कोमुरो नावाच्या तिच्या प्रियकराशी लग्न केले आहे. माको ही सम्राट नारुहितोची भाची आहे. किने आणि कोमुरो यांनी टोकियो येथील आंतरराष्ट्रीय ख्रिश्चन विद्यापीठात एकत्र शिक्षण घेतले. सप्टेंबर 2017 मध्ये त्यांनी लग्नाची घोषणा केली होती. एका सामान्य व्यक्तीशी लग्न केल्यानंतर तिने तिचा शाही दर्जा गमावला आहे.
अहवालानुसार, माको या महिन्याच्या सुरुवातीला तणावाशी लढत होती, ज्यातून ती आता हळूहळू बरी होत आहे. तिच्या लग्नाबद्दलच्या नकारात्मक बातम्यांमुळे, विशेषतः कोमुरोला लक्ष्य केल्यामुळे माको खूप तणावाखाली होती. असे मानले जाते की लग्नानंतर कोणत्याही मेजवानीचे आयोजन केले जाणार नाही किंवा इतर कोणतेही विधी होणार नाहीत.
कोमुरोच्या आईशी संबंधित आर्थिक वादामुळे त्यांचे लग्न सप्टेंबर 2017 मध्ये पुढे ढकलण्यात आले होते. हा वाद पूर्णपणे मिटला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, 30 वर्षीय कोमुरो 2018 मध्ये कायद्याचा अभ्यास करण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये होता आणि गेल्या महिन्यातच जपानला परतला होता.
विशेष म्हणजे, जपानच्या शाही नियमांनुसार एका सामान्य नागरिकाशी लग्न केल्यानंतर माकोने आता तिचा शाही दर्जा गमावला आहे. पॅलेस अधिकाऱ्यांनी सांगितले की, माकोने 140 दशलक्ष येन ($12.3 दशलक्ष) स्वीकारण्यासही नकार दिला. दुसऱ्या महायुद्धानंतर राजघराण्यातील ती पहिली सदस्य असल्याचे मानले जाते ज्यांना सामान्य व्यक्तीशी लग्न करताना भेट म्हणून पैसे मिळाले नाहीत.