Prince Harry Prince William: इंग्लंडच्या राजघराण्यात (Royal Family, England) सध्या सुरू असलेल अंतर्गत वाद विकोप्याला गेले आहेत. प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना (Prince Charles and Princess Diana) यांची सुपूत्रं प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विल्यम (Prince Harry and Megan Markle) यांच्यात सध्या वेगळीच फूट पडलेली पाहायला मिळते आहे. आपल्या आईच्या म्हणजेच प्रिन्सेस डायनाच्या निधनानंतर (Princess Diana Death) प्रिन्स हरी यांचं आयुष्यचं बदलून गेलं. आपल्या आईच्या अकाली निधनानंतर त्यांना नैराश्याचाही सामना करावा लागला होता. प्रिन्सेस डायना यांना राजघराण्यातून मिळणारी वागणूक, आपल्या पतीचे म्हणजेच प्रिन्स चार्ल्सचे कॅमेला यांच्यासमावेत असणारे संबंध, प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांचा घटस्फोट या सगळ्यातून गेल्यानंतर खुद्द प्रिन्स हॅरी यांनी जे आपल्या आईसोबत झालं तेच आपल्या पत्नीसोबत होऊ नये म्हणून राजघराण्याचा त्याग केला. आपले संंबंध चांगले प्रस्थापित व्हावेत म्हणून प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल (Meghan Markle) यांनी अतोनात प्रयत्न केले. परंतु शेवटी त्यांनीही आपल्या कोशातून बाहेर येत साधं राहण्याचाच निर्णय घेतला. आज आपल्या राजघराण्यापासून ते दूर आहेत. (prince harry duke of sussex open about fight with prince willaim autobiography spare)
प्रिन्स हॅरी यांची ऑटोबायग्राफी 'स्पेयर' (Spare) ही लवकरच प्रदर्शित होणार आहे. या आपल्या आत्मचरित्रात त्यांनी आपल्या भावावर गंभीर आरोप केले आहेत. सध्या प्रिन्स हॅरी हे खूप चर्चेत आले आहेत. त्यांची हॅरी आणि मेगन ही डॉक्यूमेंटरीही प्रदर्शित झाली आहे. ही डॉक्यूमेंटरी नेटफ्लिक्सवर (Prince Harry Documentary, Netfilx) प्रदर्शित झाली आहे. सध्या या डॉक्यूमेंटरीतूनही प्रिन्स हॅरी आणि मगेन मार्कल यांनी रॉयल फॅमिलीवर धक्कादायक खुलासे केले आहेत. याआधी ऑपेरा वनिर्फ्रे (Opera Winfrey) यांच्या शोमधूनही त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. नुकत्याच काही मुलाखतूनही प्रिन्स हॅरी यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहे.
यावेळी प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विल्यम यांच्या नात्यात दूरावा आल्याचे पाहायला मिळते आहे. 'स्पेयर' या प्रदर्शित होणाऱ्या पुस्तकातून प्रिन्स हॅरी यांनी आपल्या सख्ख्या भावासोबत झालेला गंभीर प्रसंग समोर आला आहे. प्रिन्स यांनी लिहिले आहे की, ही गोष्ट 2019 ची आहे जेव्हा प्रिन्स विल्यमसोबत प्रिन्स हॅरी यांचासोबत मोठा वाद झाला होता त्यावेळेची ही गोष्ट आहे. त्यांनी लिहिले आहे की, त्यावेळी प्रिन्स विल्यम यांच्याकडून प्रिन्स हॅरीच्या पत्नीला वाईट साईट बोलले होते. मेगन मार्कल यांच्या वागणूकीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्यात मग यावरून वाद झाले आणि त्या वादात प्रिन्स विल्यम यांनी त्यांची कॉलर पकडली आणि त्यांना जमिनीवर ढकलले. तेही इतके जोरात की त्यांना जखमंही झाली, ही जखम अजूनही माझ्या पाठीवर आहे असं प्रिन्स हॅरी म्हणाले.
प्रिन्स हॅरी यांची ऑटोबायोग्राफी 'स्पेयर' ही 10 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.