भारत - चीन दोन्ही देशांना एकत्र येऊन काम करण्याची संधी - पंतप्रधान मोदी

 भारत आणि चीनचे अनेक शतकांपासूनचे संबंध आहेत. त्यामुळे दोन्ही देशांना एकत्र येऊन काम करण्याची संधी आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 28, 2018, 08:41 AM IST
भारत - चीन दोन्ही देशांना एकत्र येऊन काम करण्याची संधी - पंतप्रधान मोदी title=

 वुहान : भारत आणि चीनचे अनेक शतकांपासूनचे संबंध आहेत. त्यामुळे दोन्ही देशांना एकत्र येऊन काम करण्याची संधी आहे असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत वुहान इथं अनौपचारिक आणि ऐतिहासिक परिषदेत मोदी बोलत होते. जगाच्या लोकसंख्येपैकी चाळीस टक्के लोक भारत आणि चीनमध्ये मिळून राहतात. अशा वेळी दोन्ही देशांतील जनतेच्या आणि एकूणच जगाच्या भल्यासाठी काम करण्याची मोठी संधी दोन्ही देशांना आहे असं मोदी म्हणालेत. दोन्ही देशांदरम्यान अशा अनौपचारिक परिषदा ही परंपरा व्हायला हवी असंही मोदींनी स्पष्ट केलंय.

डोकलाम आणि अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवरुन भारत आणि चीनमधील संबंध गेल्या काही दिवसांत खूपच ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांचे शुक्रवारी वुहान शहरातजंगी स्वागत करण्यात आले. हुबे म्यूझियममध्ये मोदींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी क्षी जिनपिंगही मोदींसोबत होते. 

स्वागत समारंभानंतर मोदी आणि जिनपिंग यांच्यात बैठकही झाली. महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमात २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्षी जिनपिंग यांच्यात पहिली अनौपचारिक बैठक झाली होती. त्यानंतरही ही दुसरी अनौपचारिक बैठक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर जिनपिंग यांनी आनंद व्यक्त केला.