मुंबई : बाळ त्याच्या जन्माच्यावेळीच गरोदर असल्याची धक्कादायक घटना कोलंबियामध्ये घडली आहे. पहिल्यांदा हा प्रकार वाचल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी झाली आहे. कोलंबियातील एका रूग्णालयात हा प्रकार घडला आहे. एका नवजात बाळाच्या पोटामध्ये आणखी एक बाळ असल्याचं उघड झालं आहे.
हा प्रकार कोलंबियातील बाराक्वेंलीमधील मोनिका वेगासोबत घडला आहे. मोनिका वेगा यांच्या गर्भात दोन बाळ असल्याच समोर आलं. बाळाला जन्म देण्यापूर्वी दोन महिने अगोदर या महिलेच्या गर्भात एक बाळ आणि बाळात एक बाळ असे अम्बेलिकल कॉर्ड असल्याचं समोर आलं.
'द सन' या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने काही दिवसांपूर्वी एका महिलेला जन्म दिला. तिच्या पोटामध्ये आणखी एक बाळ होतं. ती लहान असल्यामुळे तिच्यावर मोठ्या शर्थीने शस्त्रक्रिया करण्यात आली. गोंडस बाळाच्या पोटातून ते भ्रूण काढण्यात आलं. यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर हे बाळ अतिशय सुखरूप आहे. परंतु ही गोष्ट वाऱ्यासारखी सगळीकडे पसरत आहे.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, गर्भवती महिलेच्या अल्ट्रासाऊंड टेस्टच्यावेळी तिच्या पोटात दोन बाळं असल्याचं प्रथम निदर्शनास आलं. मात्र या दोन्ही बाळांपैकी एक बाळ हे दुसऱ्या बाळाच्या पोटात असल्याचं समजलं. डॉक्टरांना देखील हा खूप मोठा धक्का होता. अधिक चिकित्सा करून या दोन्ही बाळांची नीट काळजी घेण्यात आली.
बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या पोटात आणखी एक भ्रूण वाढत होतं. त्या भ्रूणाची योग्य वाढ झाली नव्हती. हृदय आणि मेंदू यांचा नीट विकास झाला नव्हता. यामुळे डॉक्टरांनी बाळाचं सिझेरिअन करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या योग्य निर्णयानंतर बाळाच्या पोटातील ते भ्रूण बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं.
सी-सेक्शन केलेल्या मुलीचं नाव इत्जमारा असून तिची प्रकृती स्थिर आहे. महत्वाचं म्हणजे एवढ्या लहान वयात सी-सेक्शन झाले असले तरीही तिला भविष्यात कोणतीच अडचण येणार नसल्याच म्हटलं जात आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पॅरासिटीक ट्विन्स (Parasitic Twins) चा प्रकार असून या केसला फीटस इन फेटू (Fetus in Fetu) असं म्हटलं जातं.
एखादी मुलगी जन्माला येताच तिच्यातील मातृत्व जन्माला घेऊन येते असं म्हणतात. पण ही जगातील अत्यंत दुर्मिळ अशी घटना आहे. या घटनेने आरोग्य क्षेत्रातील सगळ्याच व्यक्तींना अंचबित केलं आहे.