Pregnancy: डिलिव्हरीनंतर काही तासांनी पुन्हा प्रेग्नंट, एका वर्षात 2 मुलांना जन्म!

Pregnant Woman: एका महिलेची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांमध्ये खूपच उत्सुकता निर्माण करत आहे. कारण घटनाही तसीच आहे. एका महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर  (Delivery) रुग्णालयातून घरी पोहोचते, तेव्हाच तिला पुन्हा  प्रेग्नंट असल्याचे समजते.

Updated: Oct 16, 2022, 10:30 AM IST
Pregnancy: डिलिव्हरीनंतर काही तासांनी पुन्हा प्रेग्नंट, एका वर्षात 2 मुलांना जन्म! title=

Know Interesting Case: सोशल मीडियावर एका महिलेची गोष्ट जोरदार व्हायरल होत आहे. ज्यावेळी एखादी महिला बाळाला जन्म देते त्यावेळी तिच्या पोट दुखते. बाळाच्या जन्माच्यावेळी तिला तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. पण ज्या क्षणी ती स्त्री एका लहानशा जीवाला जन्म देते. आणि हा जीव जगात दाखल होतो. त्यावेळी त्याचे रडणे तिच्यासाठी खूप काही असते. आपले मुल पाहताच तिच्या सर्व वेदना दूर होतात आणि त्याच्या स्पर्शानी क्षणात या वेदना ती महिला विसरु जाते. मात्र, प्रसूतीनंतर (Delivery) एखादी महिला घरी पोहोचली आणि पुन्हा गर्भवती झाली तर?

काय आहे नक्की हे प्रकरण? 

लोरेन अहिन्नावाई (Lauren Ahinnawai) नावाच्या महिलेने एक व्हिडिओ शेअर केला आणि तिची संपूर्ण कहाणी सांगितली. महिलेने सांगितले की तिने 27 नोव्हेंबर 2020 रोजी एका मुलाला जन्म दिला. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 26 ऑक्टोबर 2021 रोजी महिलेने एका मुलीला जन्म दिला. वास्तविक या स्थितीला आयरिश गर्भधारणा (Irish Pregnancy) म्हणतात. 

11 महिन्यांत 2 मुलांना जन्म  

टिकटॉकवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये महिलेने सांगितले की, आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर, जेव्हा ती पालक  (Parent) बनण्याच्या तयारीचा विचार करत होती, तेव्हाच तिला तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीबद्दल माहिती मिळाली. आयरिश जुळी मुले त्यांच्या आईच्या गर्भातून (Mother's Womb) 12 महिन्यांत किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत बाहेर येतात. 11 महिन्यांत 2 मुलांना जन्म देण्याबाबत महिलेचे म्हणणे आहे की, देवाने दिलेली ही सर्वात मोठी भेट आहे.

या महिलेचा व्हिडिओ पाहून लोकांना बसला धक्का

महिलेच्या कथेने लोकांना धक्का (Shocking) बसला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेक लोक महिलेचे अभिनंदन करताना दिसले. या प्रकारावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले. एका यूजर्सने तर गंमतीत म्हटले की व्वा, तुम्ही अजिबात वेळ वाया घालवला नाही.