बींजिंग : चीमनमधील कम्युनिस्ट पक्षातील व्यवस्थेची भिंत किती गडद आहे, याची जगभरात माहिती आहे. अशा या पक्षाचे नेते शी जिनपिंग हे चीनचे अध्यक्ष आहेत. शी जिनपिंग यांच्याबाबतची एक बातमी नुकतीच प्रकाशात आली. जी पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
चीनचे अध्यक्ष शी जीनपींग हे पुन्हा एकदा चीनचे अध्यक्ष बनण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्या निवडीचे केवळ सोपस्कर बाकी असताना जीनपीपंग यांच्या खुर्चीला धक्का देण्याचा कट शिजला होता, अशी माहिती आहे. चीनमधील कम्युनिस्ट पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनीच हा कट रचला होता. शी जीनपींग यांना कटाची कुणकूण लागताच त्यांनी हा कट उधळून लावला, अशी चर्चा चीनच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आणि राजकीय वर्तुळातूनही या घटनेची दखल घेण्यात आली आहे.
शी जिनपींग यांच्या विरोधकांच्या हवाल्याने बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, जिनपींग यांनी चीनमध्ये भ्रष्टाचार विरोधात मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा वापर जिनपींग यांनी विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी आणि त्यांना तुरूंगात पाठविण्यासाठी केला आहे.
चीनच्या संरक्षण आयोगाचे प्रमुख लियु शियु यांनी उच्च अधिकाऱ्यांची एक यादी प्रसिद्ध केली आहे. हे अधिकारी अत्यंत स्वार्थी आणि भ्रष्ट होते असे म्हटले आहे. यात चीनचे माजी संरक्षण प्रमुख झोऊ योंगकांग, प्रमुख नेते बो शिलाई तसेच, सुन झेंगकाई यांच्या नावांचाही समावेश आहे. यासोबतच राष्ट्रपतींचे माजी सहकारी लिंग जिहुआ, माजी सेना प्रमुख शु काइहोऊ, माजी प्रमुख सैन्य अधिकारी गुओ बोशिओंग यांच्या नावाचाही समावेश आहे.