मारेकरी शोधा 8 कोटी बक्षीस मिळवा, 31 वर्षांनंतरही का होतेय या सेक्स वर्करच्या हत्येची चर्चा?

1991 मध्येच अमांडा बायर्नेसची हत्या झाली होती. तेव्हा ती केवळ 23 वर्षांची होती, आता या घटनेला 31 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. 

Updated: May 30, 2022, 10:51 AM IST
मारेकरी शोधा 8 कोटी बक्षीस मिळवा, 31 वर्षांनंतरही का होतेय या सेक्स वर्करच्या हत्येची चर्चा? title=

नवी दिल्ली : हे प्रकरण ऑस्ट्रेलियामधील आहे. अमांडा बायर्नेस ही दिसायला अतिशय सुंदर तिचे केस हलके सोनेरी आणि डोळे तपकिरी होते. St Kilda स्ट्रीट येथे राहणाऱ्या अमांडा हिला हेरॉईनचे व्यसन होते.

अमांडा तिची जोडीदार कॅरोलसह सेक्स वर्कर म्हणून काम करत होती. दोघींपैकी एकीला काम मिळाले तर दोघी एकत्र जात. एक जण रूममध्ये गेली कि दुसरी बाहेर थांबायची. 6 एप्रिल 1991 च्या रात्री कॅरोल हिला दातदुखीचा त्रास सुरु झाला. त्यामुळे त्या दोघीनी कामावर न जाण्याचा निर्णय घेतला.

मध्यरात्री अमांडा आपल्या घरातून कॅरोलला भेटण्यासाठी बाहेर पडली. काही वेळाने तिला एका व्हॅनमध्ये बसविण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी अमांडा हीच मृतदेह एलवूड बोटिंग क्लबजवळ सापडला.

अमांडा हिची हत्या होऊन 31 वर्ष झाली. 31 वर्षांनंतरही अमांडाच्या कुटुंबाला तिची आठवण येते. तिची बहीण तिला मांडा म्हणत असे. ती सुंदर आणि खोडकर होती, असे तिचे कुटुंबीय सांगतात.

1991 मध्ये अमांडा हिची हत्या झाली. मात्र, तिच्या मारेकऱ्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. तब्बल 31 वर्ष या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या पोलिसांनी आता मोठी घोषणा केली आहे.

याप्रकरणी 31 वर्षांपासून होमिसाईड स्क्वॉड काम करत आहे. परंतु, सीसीटीव्ही आणि आधुनिक फॉरेन्सिक डेटा नसल्याने त्यांना अडचणी येत होत्या. मात्र, पोलिसांनी हार मानली नाही. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. 

अमांडा बायर्नेसची हत्या झाली तेव्हा ती केवळ 23 वर्षांची होती. 1991 मध्ये पोलिसांनी मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्याला सुमारे 40 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मात्र, ही ऑफर देऊनही पोलिसांना कोणतीही माहिती मिळाली नाही.

या घटनेला आता 31 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. अजूनही सेक्सवर्कर अमांडा बायर्नेस हिचे मारेकरी मोकाट फिरत आहेत. कोणत्याही संशयिताची ओळख पटलेली नाही किंवा तिच्या हत्येमागचा हेतूही समजू शकलेला नाही. यामुळे सेक्सवर्कर अमांडा बायर्नेस हिच्या मारेकऱ्याला शोधून देणाऱ्यास पोलिसांनी आता सुमारे 8 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

हत्याकांड पथकाचे डिटेक्टिव्ह इन्स्पेक्टर डीन थॉमस यांनी हे प्रकरण अद्याप सक्रिय असून त्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाची उकल होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.