नवी दिल्ली : जगात भारताची वाढत असलेली ताकद यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसून येईल. आशियान देशांना पंतप्रधान मोदींनी आमंत्रण दिलं आहे.
मनिलामधील आसियान परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात म्हटले आहे की "आसियानसोबत संबंध भारताच्या परराष्ट्र धोरणाचा मुख्य आधार आहे."
पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधानांनी आसियान नेत्यांनाही आमंत्रित केले. ते म्हणाले की आम्ही दहशतवाद आणि हिंसक बंडखोरांविरोधात लढण्यासाठी वैयक्तिकरीत्या खूप मेहनत घेत आहोत. भारताने आसियानला प्रादेशिक सुरक्षा, प्रादेशिक हित आणि शांततापूर्ण विकासाच्या मुद्यांचे समर्थन देण्याचे आश्वासन दिले.
69 व्या प्रजासत्ताकदिनी मुख्य अतिथी म्हणून आसियान नेत्यांचे स्वागत करण्यासाठी भारतीय नागरिक वाट बघत आहेत. थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर, म्यानमार, कंबोडिया, लाओस आणि ब्रुनेई (दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र) हे देश आसियानचे सदस्य आहेत.
पंतप्रधानांनी पुढे म्हटले की, 'जागतिक बँकेत या वर्षी भारताने 30 पायऱ्यांनी झेप घेतली आहे. या वर्षी कोणत्याही देशांपैकी ही सर्वात मोठी झेप आहे. 'आसियान' देशांची भेट खरोखर उल्लेखनीय आणि अविस्मरणीय आहे. मला विश्वास आहे की 'आसियान' एक दृष्टी, एक ओळख आणि समुदाय म्हणून काम करत पुढे जाईल.'