बायडन यांना मागे टाकत पंतप्रधान मोदी ठरले जगातील 'सर्वोत्कृष्ठ नेते'

कोरोनाच्या काळातही मोदी यादीत अव्वल 

Updated: Jun 18, 2021, 09:05 AM IST
बायडन यांना मागे टाकत पंतप्रधान मोदी ठरले जगातील 'सर्वोत्कृष्ठ नेते' title=

मुंबई : कोरोना काळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम राहिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरातील सर्वाधिक 'ग्लोबल अप्रूवल लिडर' (Global Leader Approval) आहेत. (PM Modi approval rating at 66%, ahead of US President Biden, Germany Merkel) जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी 'Global Leader Approval ' म्हणून लोकप्रिय आहे.

अमेरिकेतील डेटा इंटेलिजेंस फर्म 'मॉर्निंग कंसल्ट' द्वारे केलेल्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'Global Leader Approval ' म्हणून स्विकारलं आहे. जागतिक नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्वेक्षणात पुढे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच ग्लोबल अप्रूवल रेटिंग 66 टक्के आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या काळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, ब्रिटेन, रूस, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह 13 देशातील इतर नेत्यांपेक्षा अव्वल ठरले आहेत. 

अमेरिका डेटा इंटेलिजेंस फर्म 'मॉर्निंग कंसल्ट' द्वारे केलेल्या सर्वेक्षणात, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदींची लोकप्रियता आणि अप्रूवल रेटिंगमध्ये घसरण पाहायला मिळाली. असं असलं तरीही मोदी यादीत टॉपवरच आहेत. इतर नेत्यांच्या तुलनेत त्यांचं काम चांगल आहे. या अप्रूवल रेटिंगमध्ये मोदींच्या पाठोपाठ इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅग यांचा नंबर लागतो. ज्यांची अप्रूवल रेटिंग 65 टक्के आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचं राष्ट्रपती लोपेज ओब्रेडोर असून त्यांची रेटिंग 63 टक्के आहे. 

जगभरातील नेत्यांची अपूर्वल रेटिंग 'मॉर्निंग कंसल्ट' ही संस्था नियमित जगभरातील नेत्यांची अप्रूवल रेटिंग ट्रॅक करत असते. यानुसार, पंतप्रधान मोदी यांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर इटलीचे प्रतप्रधान मारियो ड्रॅगी (65%), यानंतर मॅक्सिकन राष्ट्रपती एंड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रेडोर (63%), ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (54%), जर्मन चांसलर एंजेला मर्केल (53%), अमेरिकेचे राष्ट्रपति जो बाइडन (53%), कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रूडो (48%), ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (44%), दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे-इन (37%), स्पेनिश स्पेन पेड्रो सांचेज़ (36%), ब्राजीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो (35%), फ्रांसीसी राष्ट्रपती इमैनुएल मैक्रोन (35%) आणि जापानचे पंतप्रघान योशीहिदे सुगा (29%) आहेत. 

भारतात 2,216 व्यक्तींच्या सँपल साइजसोबत मॉर्निंग कंसल्ट ग्लोबल ली़डर अप्रूवल रेटिंग ट्रॅकरने पंतप्रधान मोदींकरता 66 टक्के अप्रूवल दाखवलं. तर 28 लोकांनी याला विरोध दर्शवला आहे. या ट्रॅकरला 17 जून रोजी अपडेट कऱण्यात आलं आहे. 

काय आहे मॉर्निंग कंसल्ट 

अमेरिकेच्या डाटा कंपनी 'मॉर्निंग कंसल्ट' सध्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, यूनायटेड किंगडम आणि संयुक्त राज्यात सरकारी नेत्यांकरता अप्रूवल रेटिंग ट्रॅक करत असतात. हे ग्लोबल अप्रूवल रेटिंग प्रत्येक देशातील रहिवाशांवर आधारित असते.