Meat खाणाऱ्या पुरुषांविरोधात PETA चं महिलांना आवाहन

जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...

Updated: Sep 25, 2022, 05:55 PM IST
Meat खाणाऱ्या पुरुषांविरोधात PETA चं महिलांना आवाहन title=

मुंबई : PETA या संस्थेनं पुरुषांना धडा शिकवण्यासाठी एक नवीन पद्धत आणली आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, जे पुरुष लाल मांसचा आहार करतात ते पुरूष ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे महिलांनी मांस खाणाऱ्या पुरुषांबरोबर लैंगिक संबंध ठेऊ नये, असे आवाहन ‘पेटा’ या संस्थेने केले आहे. या आवाहनानंतर जर्मनीत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. 

आणखी वाचा : 'स्वच्छता मित्र' म्हणवणाऱ्या शिक्षकाचा प्रताप, विद्यार्थिनीला घाणेरडा गणवेश काढायला लावला आणि...

‘पेटा’च्या जर्मनी येथील शाखेनं गेल्या वर्षी ‘PLOS ONE’ या जर्नलमध्ये प्रकाशित एका संशोधानचा आधार घेत म्हटले आहे की, 'पुरुष महिलांच्या तुलनेत जास्त लाल मांस खातात. पुरुष हे महिलांपेक्षा 41 टक्के जास्त प्रदूषण करतात. त्यामुळे मुलं होण्यावर बंदी घालणं आवश्यक आहे. एका मुलामागे 58.06 टन कार्बन उत्सर्जन आपण वाचवू शकतो.' तसंच तापमान वाढीपासून पृथ्वीला वाचवण्यासाठी लाल मांसाचा आहार 41 टक्के कर लावावा, असेही आवाहनही ‘पेटा’तर्फे करण्यात आले आहे.

आणखी वाचा : 'मी Gay नाही पण मला...', राम गोपाल वर्मा यांनी या लोकप्रिय अभिनेत्याला Kiss करण्याची व्यक्त केली इच्छा

जर्मनीतील काही राजकारण्यांकडून ‘पेटा’च्या या आवाहनाला विरोध करण्यात आला आहे. ‘सेक्स स्ट्राइक’ (Sex Strike) प्रकार मुर्खपणा असून लाल मांस खाणार्‍यांविरोधात सेक्स स्ट्राइक करत दोघांमध्ये फूट पाडणार्‍या विचारसरणीवर बंदी घातली पाहिजे, असे फ्लोरियन हॅन यांनी म्हटले आहे. तर जर्मनीतल्या लाल मास विक्रेत्यांनीही हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. (Petas Call s For women to do not get in physical relation with meat eating male Strike) 

आणखी वाचा : धक्कादायक! सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये मोठा वाद, सोशल मीडियावरील पोस्टमुळे एकच खळबळ

‘सेक्स स्ट्राईक’ ही संकल्पना प्राचीन ग्रीक काळातली आहे. अॅरिस्टोफेन्सच्या लिसिस्ट्राटा नाटकात स्त्रिया त्यांच्या जोडीदारांबरोबर लैंगिक संबंध नाकारून पेलोपोनेशियन युद्ध करण्यासाठी जातात, असं दाखवलं आहे. तर 2019 मध्ये जॉर्जियामध्ये नवीन गर्भपात कायद्याच्या निषेधार्थ महिलांना ‘सेक्स स्ट्राईक’ करण्याचे आवाहन करण्यात आले होते.