कुत्रा समजून पाळत होते खतरनाक प्राणी; सत्य कळल्यावर बसला धक्का

बहुतांश लोकांना कुत्रा, मांजर, रंगेबिरंगी मासे इत्यादी पाळण्याची हौस असते. 

Updated: Nov 15, 2021, 11:30 AM IST
कुत्रा समजून पाळत होते खतरनाक प्राणी; सत्य कळल्यावर बसला धक्का title=

नवी दिल्ली : बहुतांश लोकांना कुत्रा, मांजर, रंगेबिरंगी मासे इत्यादी पाळण्याची हौस असते. कुत्र्याच्या अनेक प्रजाती(Species of Dogs) जसे की, लॅब्रोडोर, जर्मन शेफर्ड, बुलडॉग, माल्टीज, बीगल्स, हस्की इत्यादी लोकांना पाळायला आवडतात. 

पेरूच्या कोमसमध्ये राहणाऱ्या कुटूंबाला कुत्रा पाळण्याची हौस होती.  काही महिन्यापूर्वी त्यांनी कुत्र्याचे एक पिल्लू विकत घेतले. हे पिल्लू मोठे झाल्यानंतर त्याची वागणूक खतरनाक होत गेली. या कुत्र्याने  कोंबड्या आणि लहान प्राण्यावर हल्ले सुरू केले अन् मारून टाकले. त्यानंतर कुटूंबाने फॉरेस्ट विभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर जे सत्य समोर आले ते धक्कादायक होते.

पेरूच्या कुटूंबाने खरेदी केला हस्की प्रजातीचा कुत्रा 
मीडिया रिपोर्ट नुसार, पेरूच्या कोमसमध्ये राहणाऱ्या या कुटूंबाने सेंट्रल लीमाच्या दुकानातून हस्की प्रजातीचे गोंडस कुत्राचे पिल्लू विकत घेतले होते. 

या पिल्लूचे नाव त्यांनी 'रन रन' ठेवले होते.  कुटूंबाने त्या कुत्र्याचा खुप प्रेमाने सांभाळ केला. जेव्हा तो मोठा होऊ लागला तेव्हा कुटूंबाला आजुबाजूच्यांकडून कुत्र्याबाबत खुप तक्रारी येऊ लागल्या.

हा कुत्रा जवळच्या पोल्ट्री फार्ममध्ये घुसून कोंबड्यांना ठार करीत असे. काही दिवसांनी तर हा कुत्रा ससे, बदक आणि मांजरींनाही लक्ष करीत होता. 

फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या रिपोर्टमध्ये खुलासा
कुटूंबाने कुत्र्याच्या वागणूकीमुळे फॉ़रेस्ट डिपार्टमेंटला या बाबतीत कळवले. डिपार्टमेंटने तपासणी केल्यानंतर, कुटूंबाला कळवले की, तुम्ही कुत्रा समजून जो प्राणी पाळत आहात तो कुत्रा नसून एक कोल्हा आहे. 

हे ऐकल्यानंतर कुटूंबाची पाया खालची जमीन सरकली. आपला कुत्रा इतर पाळीव कुत्र्यांपेक्षा जास्त आक्रमक का आहे याचे त्यांना उत्तर मिळाले. त्यानंतर त्यांनी त्या कुत्र्याला डिपार्टमेंटच्या ताब्यात दिले.