Plane Crash: विमान अपघात झाल्यानंतर थोडक्यात वाचलं जोडपं, पण Selfie घेतल्यानं..

Serious Plane Crashes: अपघातानंतर काही वेळातच एका जोडप्याला विमानातून सुखरुपरित्या बाहेर काढलं. सुदैवाने त्यांना एक ओरखडाही आला नाही. त्यानंतर त्यांनी त्या अपघातग्रस्त विमानासोबत सेल्फी काढला.

Updated: Nov 23, 2022, 05:46 PM IST
Plane Crash: विमान अपघात झाल्यानंतर थोडक्यात वाचलं जोडपं, पण Selfie घेतल्यानं.. title=

Dangerous Plane Accident in the World: पेरुची राजधानी लीमा विमानतळावर LATAM एअरलाइन्सचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं. या अपघातात विमानाला आग लागली. यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी झाले आणि शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या विमानात 120 प्रवासी होते. सुदैवाने एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. मात्र रनवेवर उभ्या असलेल्या दोन अग्निशमन जवानांचा या दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर लगेचच प्रवशांना सुखरुपरित्या बाहेर काढलं. 

एका जोडप्यानं विमानातून सुखरुपरित्या बाहेर आल्यानंतर सेल्फी काढला. फोटोत पत्नीसोबत असलेल्या पतीचं नाव एनरिक वर्सी-रोस्पिग्लियोसी असं आहे. या सेल्फीमध्ये दोघंही हसताना दिसत आहेत. त्याचबरोबर चेहरा आणि कपड्यावर आग विझवताना वापरलेलं केमिकल दिसत आहे. त्यांच्या मागे विमान दिसत असून अर्धवट जळले आहे. त्याचबरोबर उजव्या पंखावर झुकलेलं दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, 'जेव्हा आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देते'.

बातमी वाचा- "मी गटाराचं पाणी प्यायलो, टॉयलेट...", Bill Gates यांचा धक्कादायक खुलासा

A320 Systems नावाच्या फेसबुक पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करताना 'सेल्फी ऑफ द इयर, थँक गॉड तो ठीक आहे' असे कॅप्शन लिहिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही लोकांनी त्या दोघांना नवं जीवनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही जणांना या सेल्फीवर टीका केली आहे. एका युजर्सने लिहिलं आहे की, "दोन जण मृत पावले असताना कसला सेल्फी काढता, असं वागणं वेदनादायी आहे." दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "दुर्घटनेत आपण जिवंत आहोत आणि काहीच झालं नाही, असं दाखवायचं आहे का?"