Salary interesting facts : पगाराचा आकडा हे जणूकाही गूढच, असंच अनेकजण वागतात. मुळात आपल्याला नेमका किती पगार येतो हे अनेकजण त्यांच्या चांगल्यातल्या चांगल्या मित्रांनाही सांगत नाहीत. हो, पण त्याचवेळी मित्राला नेमका किती पगार मिळतो हे जाणून घेण्यासाठी मात्र ही मंडळी उत्सुक असतात. मुळात स्वत:व्यतीरिक्त इतरांचा पगार जाणून घेण्यासाठीची उत्सुकता, त्यानंतरची चर्चा हे सर्व आताच सुरु झालं आहे असं नाही. किंबहुना बऱ्याच वर्षांपासून हाच पाढा गिरवला जात आहे. (How to know one anothers salary?)
बऱ्याच प्रयत्नांनंतरही या मोहिमेत येणारं अपयशही अनेकांच्याच वाट्याला आलं असेल. पण, तुम्हाला माहितीये का? जगाच्या पाठीवर एक असाही देश आहे जिथं नागरिकांना एकमेकांच्या पगाराची माहिती असते. हा देश म्हणजे नॉर्वे (Norway). काळानुरुप या देशात पगाराविषयी मिळणारी ही पुस्तकी माहिती आता एका क्लिकवर Digital स्वरुपात उपलब्ध आहे.
या माहितीत नेमकं काय?
प्रत्येक व्यक्तीचं एकूण उत्पन्न, त्यांनी भरलेला कर आणि त्यांच्या संपत्तीचा एकूण आकडा याबाबतची माहिती यामध्ये नोंदवलेली असते. तुम्हाला माहितीये का, भारताच्या तुलनेत नॉर्वेतील नागरिक जास्त आयकर भरतात. हा फरक साधारण 10.2 टक्क्यांचा आहे.
नॉर्वेमध्ये पगाराच्या आकड्याविषयी बरीच पारदर्शकता पाहायला मिळते. किंबहुना बहुतांश कंपन्यांमध्ये ही माहिती संस्थेकडूनच कर्मचाऱ्यांना दिली जाते. कर्मचाऱ्यांमध्ये एकमेकांच्या पगारामुळं द्वेषभाव निर्माण होऊ नये हाच त्यामागचा मुख्य हेतू असतो.
महिला आणि पुरुषांच्या पगारात बरीच समानता असणाऱ्या नॉर्वेमध्ये तुम्हाला कोणा व्यक्तीच्या पगाराविषयीची माहिती करुन घ्यायची झाल्यास त्यासाठी Tax Authority च्या संकेतस्थळावर भेट देऊन राष्ट्रीय ओळखपत्र क्रमांरानं Login करावं लागतं. निनावी पद्धतीनं इथं कोणतीही माहिती शोधू शकत नाही.
या सुविधेचे वाईट परिणाम
सर्वांचे पगार सर्वांना ठाऊक असणाच्या या सुविधेमुळे नागरिकांमध्ये ईर्ष्येची भावना तर बळावली नाही. पण, असं असलं तरीही या युरोपीय राष्ट्रामध्ये समाजिक स्तरांत असणारी तफावत मात्र वाढताना दिसली. थोडक्यात नाण्याची दुसरी बाजू इथंही नकारात्मकच निघाली.