बाप शेर तर मुलगा सव्वा शेर...मोबाईल दिला नाही म्हणून, मुलानेच बापाला टाकलं आरोपीच्या पिंजऱ्यात... पोलीसही अवाक्

स्मार्टफोनचे लहान मुलं तसेच तरुण पिढीला व्यसनच लागले आहे ज्याचे मुलांवर वाईट परिणाम होत आहेत.

Updated: Jul 27, 2021, 05:26 PM IST
बाप शेर तर मुलगा सव्वा शेर...मोबाईल दिला नाही म्हणून, मुलानेच बापाला टाकलं आरोपीच्या पिंजऱ्यात... पोलीसही अवाक् title=

मुंबई : तसे पाहाता स्मार्टफोनमुळे, आपल्या जीवनातील बर्‍याच गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत. परंतु टेक्नोलॉजी किंवा फोनचे जेवढे फायदे आहेत तितके त्याचे तोटे देखील आहेत. कारण या स्मार्टफोनचे लहान मुलं तसेच तरुण पिढीला व्यसनच लागले आहे ज्याचे मुलांवर वाईट परिणाम होत आहेत. यामुळे त्यांच्या वागण्या बोलण्यापासून ते त्यांच्या सवयी पर्यंत, त्याच बरोबर हेल्थ पासून ते त्यांच्या रोजच्या सवयावर याचे परिणाम होऊ लागले आहेत. बर्‍याच वेळा स्मार्टफोन आणि गेम्समुळे मुलं त्यांचा अभ्यास करायला विसरतात. ज्यामुळे पालक देखील आपल्या मुलांवर रागवतात परंतु मुलांवर त्याचा काहीही परिणाम होत नाही.

असेच एक प्रकरण सध्या समोर आले आहे. एका 14 वर्षाच्या मुलाच्या वडिलांनी त्यांच्या मुलाला घरातील कामं करण्यास सांगितले तेव्हा त्या मुलाला राग आला आणि त्याने यासाठी पोलिसांना बोलवले.

एका वृत्तानुसार ही विचित्र घटना चीनच्या अनहुई प्रांताची आहे. आपला मुलगा सतत फोनमध्ये व्यस्त असल्याचे पाहून त्याच्या पालकांना त्यांच्या मुलाच्या भविष्य़ाची काळजी वाटली. म्हणून त्यांनी त्याला अभ्यास करायला सांगितले, परंतु तरीही त्या मुलाने मानले नाही. शेवटी, पालकांनी त्या मुलाला धडा शिकवण्याचे ठरवले, यासाठी त्यांनी आपल्या मुलाला घरगुती कामे करण्यासाठी सांगितले. पण यानंतर मुलाने त्याच्या पालकांची तक्रार पोलिसात दाखल केली, पोलीस दारात येताच या मुलांच्या पालकांना धक्का बसला.

वडिलांनी घरचे काम करायला सांगितल्यामुळे त्यांच्या मुलाला राग आला, आणि रागाच्या भरात त्याने पोलिस स्टेशन गाठला. त्याने पोलिसांना सांगितले की, माझे वडील मला बालमजुरी करायला सांगत आहेत. पोलिसांनाही काळी वेळासाठी काय चालले आहे हे समजले नाही, म्हणून मग ते या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुलाच्या घरी गेले.

जेव्हा त्यांच्या मुलासोबत त्या व्यक्तीच्या घरी पोलिस पोहोचले, तेव्हा त्याचे पालक आश्चर्यचकित झाले. त्याने पोलिसांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली आणि सांगितले की, फोनवरुन मुलाचे लक्ष वळवण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलाला घरातील काम करण्यासाठी सांगितले होते.

जेव्हा मुलाला स्मार्टफोनच्या व्यसनाबद्दल पोलिसांना कळले तेव्हा पोलिसांनी त्यामुलाच्या वडिलांना आपल्या मुलाला शिस्त लावायला सांगितले. यासोबतच ते म्हणाले की, स्मार्टफोनपासून मुलाला दूर ठेवण्यासाठी काही दुसरे प्रयोग करा. परंतु जवळ उभे असलेल्या त्या मुलाने रागाने उत्तर दिले - " तुम्हाला जर असे वाटत असेल की, माझ्याकडे फक्त हा एकच मोबाइल आहे. तर तुम्ही पूर्णपणे अज्ञानी आहात."