इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये काही वेळासाठी एकच गोंधळ उडाला. जेव्हा एका प्रमुख टीव्ही न्यूज चॅनल असलेल्या डॉनच्या टीव्ही स्क्रीनवर भारताचा तिरंगा फडकला. काही काळाने लक्षात आलं की न्यूज चॅनल हॅकर्सने निशाणा बनवलं होतं.
रविवारी डॉन स्क्रीनवर अचानक भारतीय तिरंगा दिसला. ज्यावर 'हॅप्पी इंडिपेंडेंस डे' असं लिहिलं होतं. काही वेळा करता कुणालाच काही समजलं नाही. पण थोड्यावेळाने लक्षात आलं की, हॅकर्सने न्यूज चॅनलला निशाणा बनवलं होतं. या घटनेचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dawn news channels of Pakistan hacked by Hackers https://t.co/vIrmd9Tvau
— News Jockey (@jockey_news) August 2, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ३.३० च्या आसपास DAWN न्यूज चॅनलवर एक जाहिरात प्रसारित करण्यात आली. त्याच दरम्यान टीव्ही स्क्रीनवर तिरंगा फडकवलेला दिसला. मात्र अद्याप हे कुणी केलं नाही हे काही कळलेलं नाही.
पाकिस्तानी मीडिया समुहाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चॅनलने उर्दूमध्ये ट्विट करून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सध्या चॅनल या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.
पण असा प्रसंग होण्याची ही काही पहिली वेळ नाही. या अगोदर देखील हॅकर्सने मीडिया सरकारी संस्थाच्या वेबसाइटवर देखील निशाणा साधला आहे.