पाकिस्तानमध्ये इतिहासातलं सर्वात मोठं आर्थिक संकट, डिझेल 329 रुपये लीटर तर पेट्रोल...

Pakistan Petrol-Diesel Price Hike : पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अनवारुल हक काकर यांनी पाकिस्तानी जनतेला मोठा धक्का दिला आहे. शुक्रवारी रात्री पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करत असल्याची घोषणा त्यांनी केली आणि पाकिस्तानात एकच हाहाकार उडाला.

राजीव कासले | Updated: Sep 16, 2023, 09:04 PM IST
पाकिस्तानमध्ये इतिहासातलं सर्वात मोठं आर्थिक संकट, डिझेल 329 रुपये लीटर तर पेट्रोल... title=

Pakistan Economic Crisis : पाकिस्तान देश इतिहासातल्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाला सामोरा जात आहे. महागाईने (Inflation) कळस गाठळा असून सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलं आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. श्रीमंत माणूस गरीब झालाय आणि गरीब माणूस भिकेला लागलाय अशी परिस्थिती सध्या पाकिस्तानात आहे. हे कमी की काय पाकिस्तानच्या हंगामी सरकारने (Pakistan Caretaker Govt) जनतेला आणकी एक मोठा धक्का दिला आहे. शुक्रवारी रात्री पाकिस्तान सरकारने एक मोठी घोषणा केली आणि संपूर्ण पाकिस्तानात हाहाकार माजला. पाकिस्तानात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठ्याप्रमाणावर वाढ (Pakistan Petrol-Disel Price Hike) झाली आहे. नव्या दरामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती 300 रुपयांच्या पार गेल्या आहेत. 

एक लीटर पेट्रोलही आवाक्याबाबेर
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ करत आधीच्या शहबाज शरीफ सरकारने पाकिस्तानी जनतेच्या डोक्यावर महागाईचं ओझ वाढवलं होतं. त्यावर आता हंगामी पंतप्रधान अनवारुल हक काकर सरकारने कळस चढवला आहे. हंगामी सरकारने शुक्रवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवत असल्याची घोषणा केली. पेट्रोल आणि हायस्पीड डिझेलच्या दरात  26.02 रुपये आणि 17.34 रुपये प्रति लीटरची वाढ केली. त्यामुळे पाकिस्तानात एक लीटर पेट्रोलची किंमत आता 331 रुपये 38 पैसे इतकी झाली आहे. तर एक लीटर डिझेलचीी किंमत 329.18 रुपये इतकी झाली आहे. 

इंधनात 20 टक्के वाढ
शहबाज शरीफ सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतर हंगामी सरकार सत्तेत आलं. यानंतर पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या दरमता जवळपास 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 15 ऑगस्ट 2023 नंरतर इंधनदरातील ही दुसरी मोठी वाढ आहे. एका महिन्याच्या आत पेट्रोलच्या दरात 58.43 तर डिझेलच्या दरात 55.83 रुपये वाढ झाली आहे. 

सरकारने सांगितलं महागाईचं कारण
डॉनच्या बातमीनुसार  Petrol आणि High Speed Diesel च्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा हंगामी पंतप्रधान अनवारुल हक काकर (Caretaker PM Anwaarul Haq Kakar) यांच्या मंजुरीनंतर करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने पेट्रोलियम उत्पादनात वाढ करण्यात आल्याचं हंगामी सरकारने म्हटलंय. 

पाकिस्तानमध्ये महामाईने कळस गाठला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर तर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. पाकिस्तानता पेट्रोलियम उत्पादनावर शून्य जीएसटी आहे. पण सरकारकडून पेट्रोलवर 60 रुपये प्रतीलीटर तर डिझेलवर 50 रुपये प्रतीलीटर सीमाशुल्क वसूल केलं जात आहे.