नववधुची हौसच न्यारी! लग्नाला तब्बल 100 किलोचा लेहंगा : VIDEO

सोशल मीडियावर नववधुच्या लेहंग्याची चर्चा रंगलीय 

Updated: Jul 28, 2021, 01:46 PM IST
नववधुची हौसच न्यारी! लग्नाला तब्बल 100 किलोचा लेहंगा : VIDEO  title=

मुंबई : प्रत्येकाला आपल्या लग्नाचा दिवस हा खास साजरा करायचा असतो. हा दिवस खास करण्यासाठी नववधु लग्नातील कपडे हटके निवडते. लग्नाच्या कपड्यांसाठी खास डिझाइन, कलर आणि एम्ब्रॉइडरी असे लेहंगे घालणं पसंत करतात. असाच एका नववधुचा लेहंगा सोशल मीडियावर चर्चेत आहे. (Pakistani Bride Wore A 100 Kg Lehenga On Her Wedding Day Covering The Entire Stage)  या नववधुने संपूर्ण जगाचं लक्ष आपल्या लेहंग्याकडे वेधून घेतलं आहे. 

पाकिस्तानच्या या नववधुने एक दोन किलो नाही तर तब्बल 100 किलोचा लेहंगा घातला आहे. याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला आहे. या नववधुने लग्नाला लाल रंगाचा लेहंगा घातला आहे. या रंगाच्या लेहंग्यात नववधु अतिशय सुंदर दिसत आहे. यावर रिच क्रिस्टल एँड सिल्वर सीक्वंस व थ्रेड वर्क देखील करण्यात आलं आहे, 

या लेहंग्याचा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे त्याची टेल डिझाइन. या लेहंग्याची उंची फार आहे. या पोर्शनला देखील एम्ब्रॉइडरी केली आहे. रिपोर्टसनुसार, लेहंग्याची टेल डिझाइन आणि वर्कमुळे याचं वजन 100 किलो आहे. सोशल मीडियावर हा लेहंगा पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. अनेकांना प्रश्न पडला की, या लेहंग्यात नववधुने वॉक केला आहे का?

हा लेहंगा घातल्यानंतर अनेकांना अभिनेता प्रियंका चोप्राच्या लग्नातील सफेद रंगाचा गाऊन आठवला. प्रियंकाच्या लेहंगाची लांबी अतिशय लांब होती. जागतिक स्तरावरही प्रियंकाच्या लेहंग्याची चर्चा रंगली.