पाकिस्तानच्या इमरान खान सरकारवरील संकट टळलं

विश्वासदर्शक ठरावात मिळाली 178 मतं 

Updated: Mar 6, 2021, 03:46 PM IST
पाकिस्तानच्या इमरान खान सरकारवरील संकट टळलं title=

पाकिस्तानमधल्या इमरान सरकारवरचं संकट टळलंय. विश्वासदर्शक ठरावात बहुमत जमवण्यात त्यांना यश आलं आहे. पाकिस्तानच्या लोकसभेत आज विश्वासदर्शक ठराव ठेवण्यात आलेला. यामध्ये इमरान खान यांच्या बाजूने 178 मतं पडली. विश्वासदर्शक ठराव जिंकायला 172 मतांची गरज होती.

सिनेट निवडणुकीत पाकिस्तानचे अर्थमंत्री अब्दुल हफीज शेख यांचा पराभव झालेला. त्यानंतर पाकिस्तानमधील विरोधीपक्ष डेमोक्रॅटिक मूव्हमेंट पक्षाने इमरान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली. यानंतर स्वत: इमरान खान यांनीच विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली.

ऐन मतदानावेळी विरोधकांनी सभात्याग केल्यानं, पारडं इमरान खान यांच्या बाजूने जड झालं, आणि ते विजयी झाल्याचं अध्यक्षांनी घोषित केलं.

पाकिस्तानच्या लोकसभेमध्ये 342 सदस्य असतात. यामध्ये सत्ताधारी आणि इमरान खान यांच्या तेहरीक-ए-इंसाफ पक्षाचे 156 सदस्य आहेत. इतर पक्षांच्या साथीने इमरान खान यांनी सरकार स्थापन केलेलं.