पाकिस्तानात भुकमारीचे बळी, जगाकडे मागितला मदतीचा हात

पंतप्रधान इम्रान खान यांनी जागतिक समुदायाकडे मदतीची याचना केली

Updated: Apr 13, 2020, 09:49 AM IST
पाकिस्तानात भुकमारीचे बळी, जगाकडे मागितला मदतीचा हात title=

इस्लामाबाद : कोरोना वायरसने जगभरात थैमान घातले असून मोठमोठ्या देशांच्या अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. अशावेळी आधीच आर्थिक चणचणीत असलेल्या पाकिस्तानची स्थिती अधिक खराब झाली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी जागतिक समुदायाकडे मदतीची याचना केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानात भुकमारीची स्थिती निर्माण झाली आहे. 

इम्रान खान यांनी ट्वीट करुन मदतीची मागणी केली आहे. मी आंतरराष्ट्रीय समुदाय, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि आंतरराष्ट्री आर्थिक संस्थांना अपील करतो की ज्या पद्धतीने विकसनशील देश कोविड-१९ महामारीचा सामना करत आहेत, त्यांना सकारात्मक प्रतिक्रिया दिली जावी असे ते म्हणाले. 

मला आजा वैश्विक समुदायासमोर माझं म्हणणं पोहोचवायचे आहे. विकसनशिल आणि विकसित देश अशा दोन प्रतिक्रिया येत आहेत. विकसित देश लॉकडाऊनच्या माध्यमातून कोरोनाला रोखत आहेत. यातून ढासळलेली अर्थव्यवस्था संभाळत आहेत. पण विकसनशिल देशांसमोर हे मोठं आव्हान आहे. कोरोना रोखणं, आर्थिक स्थिती सुधारण्यासोबतच लोकांची भूकमारी ही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. 

पाकिस्तान सरकारने गरजुंसाठी ८ बिलियन डॉलर प्रोत्साहन पॅकेज दिल्याचेही इम्रान खान म्हणाले.

विकसनशिल देशांकडे इतके पैसे नाहीत की ते आरोग्य सेवांवर खर्च करु शकतील. त्यामुळे वित्तीय संस्था आणि युनायटेड नेशनच्या जनरल सेक्रेटरींनी सहकार्य करावे. यामुळे विकसनशिल देशात कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखले जाऊ शकतील असे इम्रान खान म्हणाले.