पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढण्यामागे चीनचा हात; ड्रॅगनच्या मनात चाललंय तरी काय?

Pakistan News : जाणून आश्चर्य वाटेल, पण जगातील सर्वाधिक गाढवं असणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा तिसरा क्रमांक येतो. यामागं चीनला कारणीभूत ठरवलं जात आहे. का? जाणून घ्या... 

Updated: Jun 10, 2023, 11:00 AM IST
पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढण्यामागे चीनचा हात; ड्रॅगनच्या मनात चाललंय तरी काय?  title=
pakistan number of donkeys increased because of china read detail story

Pakistan donkeys population : गेल्या काही काळापासून पाकिस्तानात प्रचंड राजकीय अस्थिरता पाहायला मिळाली. देशावर आलेलं आर्थिक संकट आणि दिवाळखोरीची भीती या साऱ्यावर मात करणं शक्य होत नाही तोच पाकिस्तानातून आणखी एक लक्षवेधी माहिती समोर आली आहे. ज्या पाकिस्तानाच दोन वेळच्या अन्नासाठी नागरिकांना बरीच ओढाताण करावी लागत आहे, त्याच पाकिस्तानात म्हणे गाढवांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 

पाकिस्तानमध्ये या प्राण्याच्या प्रजातीमध्ये वाढ होण्यामागे मित्रराष्ट्र चीनला जबाबदार ठरवलं जात आहे. चीनमधून श्वानांप्रमाणंच गाढवांचीही आयात करण्यात येते. यामागेही या देशाचा हेतू आहे जो आता जगासमोर आला आहे. 

एक लाखानं वाढली गाढवांची संख्या... 

पाकिस्तानच्या 2022 - 23 या वर्षाच्या आर्थिक सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार या देशात वर्षभरामध्ये गाढवांची संख्या 57 लाखांवरून थेट 58 लाखांवर पोहोचली आहे. 2019- 20 मध्ये हीच संख्या 55 लाखांवर आणि त्यानंतर 56 लाखांवर पोहोचली होती. सूत्रांच्या माहितीनुसार आणि उपलब्ध आकडेवारीनुसार पाकिस्तान हे जगातील सर्वाधिक गाढव असणारं तिसऱ्या क्रमांकाचं राष्ट्र असून, या यादीत चीन अग्रस्थानी आहे. 

चीमध्ये गाढवांना इतकी मागणी का? 

चीनमध्ये गाढवांची संख्या कमी होत असल्यामुळं इथं त्यांची आयात केली जाते. सहसा चीन पाकिस्तानातूनच गाढवांची आयात करतं. फक्त गाढवच नव्हे तर श्वानांची आयातही पाकिस्तानकडूनच केली जाते. 

गाढवांच्या त्वचेचा वापर... 

पारंपरिक चिनी औषधं तयार करण्यासाठी चीनमध्ये गाढवांच्या त्वचेतून Gelatin काढलं जातं. या प्रक्रियेमध्ये गाढवांना मारून त्यांचं कातडं काढून त्यातून हा घटक मिळवला जातो. कातडं उकळवून त्या प्रक्रियेनंतर Gelatin मिळतं असं म्हणतात. 'गार्डियन'मधील काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार Gelatin मुळं मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

हेसुद्धा वाचा : टोल भरल्यानंतर तुम्हाला मिळालेली पावती फेकू नका; तिचे फायदे जाणून थक्कच व्हाल 

दरम्यान, 2022 मध्ये आयात- निर्यातीसंबंधीच्या एका सभेमध्ये पाकिस्तानच्या अर्थमंत्रालयाशी संलग्न असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून चीननं श्वान आणि गाढवांच्या आयातीत रस दाखवल्याची बाब स्पष्ट केली होती. ज्यानंतर पाक प्रशासनाकडून पंजाब प्रांतातील ओकाला जिल्ह्यात 3 हजार एकरांहून अधिक मोठ्या क्षेत्रावर एक फार्म तयार केलं, जिथून गाढवांची निर्यात होणं अपेक्षित होतं. पाकिस्तानआधी चीन दक्षिण आफ्रिकन देशांमधून गाढवांची आयात करत होता. पण, त्या देशांनी गाढवांच्या निर्यातीवर बंदी लावल्यामुळं चीननं पाकिस्तानकडे आपला मोर्चा वळवला.