पाकिस्तानात होळी सेलिब्रेट करणाऱ्यांना चक्क 10-10 हजार रुपये दिले जाणार! सरकारची घोषणा

पाकिस्तानात होळी साजरी करणाऱ्यांना 10 - 10 हजार रुपये मिळणार आहेत. सरकारने होळी स्पेशल पॅकेजची घोषणा केली आहे. 

Updated: Mar 25, 2024, 06:20 PM IST
पाकिस्तानात होळी सेलिब्रेट करणाऱ्यांना चक्क 10-10 हजार रुपये दिले जाणार! सरकारची घोषणा title=

Holi in Pakistan:  भारतासह संपूर्ण जगभरातील अनेक देशांमध्ये होळी हा सण साजरा केला जातो. पाकिस्तानही होळीची विशेष धूम पहायला मिळते. अशातच पाकिस्तानात होळी सेलिब्रेट करणाऱ्यांना चक्क 10-10 हजार रुपये दिले जाणार आहेत. पाकिस्तान सरकारने याबाबत घोषणा केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या या अनोख्या पॅकेजमुळे पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदू बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

पाकिस्तानच्या पंजाब प्रांत सरकारने हिंदू समुदायासाठी होळीच्या विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजअंतर्गत पंजाब प्रांतात राहणाऱ्या हिंदू कुटुंबांना होळी साजरी केल्यास 10,000 रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे हिंदू बांधवांना  चेकद्वारे दिले जाणार असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशातील हिंदू बांधवांना होळीच्या शुभेच्छा देताना या अनोख्या पॅकेजची घोषणा केली आहे. 

काय आहे पाकिस्तान सरकारी योजना?

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात राहणाऱ्या जवळपास 700 हिंदू कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पाकिस्तानात राहणारे सर्वांधिक हिंदू नागरिक पंजाब प्रांतमध्येच राहतात. सामाजिक एकोपा वाढवावा हिंदू बांधवांना आपले सण कोणत्याही दबावाखाली न राहता साजरे करता यावेत यासाठी या पॅकेजची घोषणा  करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली. हिंदू समाजाचा आनंद वाढवण्यासाठी होळी पॅकेज अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपयांचे धनादेश वितरित केले जातील असे पंजाब प्रांतच्या मुख्यमंत्री सचिवालयातर्फे सांगण्यात आले. पंजाब प्रांतचे मुख्यमंत्री मरियम नवाज यांनीही हिंदू समुदायाला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

उत्तर प्रदेशातील अयोध्येत होळीचा उत्साह पाहायला मिळाला. होळीनिमित्त श्रीराम मंदिरात भजन आणि विशेष आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी एकमेकांना रंग लावून होळी साजरी केली. यावेळी भाविकांत मोठा उत्साह पाहायला मिळाला.
गुजरातच्या खेडा गावात पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करण्यात आली. यावेळी लोकांनी निख-यावर चालून दरवर्षीप्रमाणे होळी साजरी केली. या गावातील ही जुनी परंपरा आहे. ही होळी पाहण्यासाठी आजूबाजूच्या भागातून लोक मोठ्या संख्येने इथं येत असतात.

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये होळी साजरी करण्यात आली. महाकालेश्वर मंदिरात होळीचं दहन करण्यात आलं. महादेव, विष्णू यांची आरतीकेल्यानंतर होळीचं दहन करण्यात आलं. त्यानंतर भाविकांनी रंग उधळून होळी साजरी केली.
झारखंडच्या बैद्यनाथ शिव मंदिरात अनोख्या पद्धतीने होळी साजरी होतेय. होळीनिमित्ताने मंदिरात शिवलींगाला लाल रंगाने सजवण्यात आलं..हजारो भाविक मंदिर परिसरात होळी साजरी करण्यासाठी दाखल झालेत.