इस्लामाबाद : पाकिस्तानात ११ वी सार्वजनिक निवडणूक झाली. २७२ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. मतदानानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीचे निकाल हे इम्रान खानच्या पार्टीच्या बाजुने लागलेत. दरम्यान, इम्रान खान ज्या ठिकाणाहून उभा राहिला ती जागा गमावली आहे. मात्र, इम्रानचा पक्ष या निवडणुकीत पुढे जाताना दिसत आहे. ७३ जागांची आघाडी घेतली आहे. यासाठी पाकिस्तान लष्कराने मदत केल्याचे बोलले जात आहे. तसा आरोपही करण्यात आलाय.
#PakistanGeneralElections: According to ARY news, Imran Khan’s PTI is leading in trends pic.twitter.com/EB3z3jbgmU
— ANI (@ANI) July 25, 2018
इम्रान खानचा राजकीय पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ७३ जागा मिळवून हा सध्या एक नंबरवर आहे. तर नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लीम लीग ही पार्टी दोन नंबर असून ४९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर बिलावल भुत्तो यांची पार्टीने २६ जागांवर आघाडी घेत तीन नंबरवर आहे. दरम्यान, अन्य ६१ जागांवर आघाडीवर आहे. तर दहशतवादी हाफीस सईद याच्या पक्षाला एकही जागा मिळालेली नाही.
२६ वर्षानंतर पाकिस्तानात मोठा खेळ झालाय. इम्रान खान याने १९९२ मध्ये विश्व चषक जिंकल्यानंतर पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या हस्ते गौरव झाला. त्यांच्यासोबत फोटो काढला होता. मात्र, २६ वर्षानंतर स्थिती बदललेली गेली आहे. नवाज शरीफ यांनी स्वप्नातही पाहिलेले नसेल. मात्र, इम्रान खान हा पाकिस्तानच्या सर्वोच्च पदी बसण्याची शक्यता आहे. तर नवाज शरीफ तुरुंगात आहेत.
दरम्यान, इम्रान खान याचे पाकिस्तानात कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे स्वप्न होते. ते त्याचे स्वप्न पूर्ण झाले. दरम्यान, पंतप्रधान नवाज शरीफ यांनी कॅन्सर रुग्णालयासाठी सर्वोतोपरी मदत केली. त्यानंतर हे रुग्णालय उभे राहिले. त्यानंतर इम्रान खान याला राजकारणात येण्याचे निमंत्रण दिले गेले होते, त्यावेळी त्याने राजकारणात रस नसल्याचे म्हटले होते.
मात्र, सध्या उलटी स्थिती दिसून येत आहे. इम्रान खान राजकारणात असून तो एका राजकीय पक्षाचा प्रमुख आहे. इम्रान खान हा पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. तर नवाज शरीफ हे सध्या तुरुंगात आहेत.