इस्लामाबाद : पाकिस्तानातील कराची- रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला (Karachi-Rawalpindi Tezgam express train) लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा वाढला आहे. या आगीत ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. कराची रावळपिंडी एक्स्प्रेसला आग लागल्यानंतर या अपघातात अनेक जण जखमी झालेत. जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहेत. आज कराची रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला भीषण आग लागली. सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागली, असल्याची माहिती पुढे येत आहे. या आगीमुळे अनेक प्रवासी जखमीही झाले आहेत. जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
#UPDATE Death toll rises to 65, in incident where fire broke out in Karachi-Rawalpindi Tezgam express train in Liaqatpur near Rahim Yar Khan, earlier today: Geo News #Pakistan pic.twitter.com/CeMEexjUj6
— ANI (@ANI) October 31, 2019
पाकिस्तानच्या (Pakistan) कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला गुरुवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत आतापर्यंत १६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर १२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पोहोचले असून त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. मात्र, रेल्वेला आग कशी लागली याची माहिती मिळू शकलेली नाही.
कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेस (Karachi-Rawalpindi Tezgam express train) गुरुवारी सकाळी रहीम यार खान रेल्वे स्टेशनजवळील लियाकतपूर येथे पोहोचली. त्यावेळी रेल्वेच्या एका डब्यात भीषण आग लागली. ही आग इतकी वेगात पसरली की प्रवाशांना सुटका करुन घेण्याची संधीही मिळू शकलेली नाही.
Pakistan: Death toll rises to 16, in incident where fire broke out in Karachi-Rawalpindi Tezgam express train in Liaqatpur near Rahim Yar Khan today. pic.twitter.com/wDmxPfN6gh
— ANI (@ANI) October 31, 2019
ही अपघात घडली त्यावेळी प्रवासी गाडीमध्ये झोपलेले होते, अशी माहिती सांगण्यात येत आहे. आगीमुळे आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १३ लोक गंभीर जखमी आहेत.