Pakistan Violence Video And Photos: पाकिस्तानमधील संघर्ष दिवसोंदिवस अधिक तिव्र होत असून परिस्थिती चिघळत असल्याचं पहायला मिळत आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी सरकारवर गंभीर आरोप सुरु ठेवले असताना त्यांना जामीन देण्याच्या पाकिस्तान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात सत्ताधारी पक्षांच्या समर्थकांनी सुप्रीम कोर्टाच्या बाहेर आंदोलन सुरु केलं आहे. आज या आंदोलनादरम्यान सरकार समर्थकांनी बळजबरीने कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला. सोमवारी पाकिस्तान डेमोक्रेटीक मुमव्हमेंट (पीडीएम) पक्षाचे समर्थक राजधानी इस्लामाबादमध्ये रस्त्यावर उतरले आणि त्यांनी इम्रान यांची सुटका करण्याचा निर्णय दिल्याचा विरोध सुरु केला. या समर्थकांनी इस्लामाबादमध्ये असलेल्या सुप्रीम कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
पीडीएमचे कार्यकर्ते सुप्रीम कोर्टाच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढले आणि त्यांनी कोर्टाच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनादरम्यान इम्रान खान यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. इम्रान खान यांना सवलत देऊन सुप्रीम कोर्टाने अयोग्य गोष्ट केली आहे, असं आंदोलकांचं म्हणणं होतं. पीडीएमने रविवारीच या आंदोलनाची घोषणा केली होती. सोमवारपर्यंत इम्रान खान यांना कोणत्याही प्रकरणात अटक करुन नये असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. आज या प्रकरणात पुन्हा सुनावणी होण्याआधीच सुप्रीम कोर्टाबाहेर मोठ्या संख्येनं पीडीएमचे कार्यकर्ते जमा झाले आहेत. आंदोलनाची घोषणा करण्यात आल्यानंतर पीडीएमचे नेते मौलाना फजल यांच्याबरोबर शहबाज शरीफ सरकारने दोन बैठकी घेऊन आंदोलनाचं स्थळ बदलावं यासाठी प्रयत्न केले. मात्र सरकारला यश न आल्याने आज सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्याप्रमाणात आंदोलकांची गर्दी होऊ लागली.
Whole Fascist System exposed beyond doubts. @ICT_Police welcomes Diesel's violent goons to attack Supreme Court of #Pakistan 220 million ppl aren't ants & won't accept criminals who have attacked, tortured & killed citizens. Time up for stooges & handlers. #آئین_بچاؤ_پاکستان_بچاؤ pic.twitter.com/hXB1HwYPp3
— Faisal Amin Khan (@FaisalAminKhan) May 15, 2023
पाकिस्तान सरकारने मंगळवारी इम्रान खान यांना इस्लामाबाद येथील हाय कोर्टामधून अटक केली. इम्रान हे कोर्टातून बाहेर पडत असतानाच पाकिस्तानी रेंजर्सने त्यांना ताब्यात घेतलं. इम्रान यांच्या अटकेनंतर त्यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ म्हणजेच पीटीआयच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी देशातील अनेक ठिकाणी हिंसाचार केला. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी लष्करच्या अधिकाऱ्याचं घरही जाळून टाकण्यात आलं. आंदोलनामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. पीडीएमच्या हिंसक आंदोलनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पक्षाचे झेंडे हातात घेऊन अनेक कार्यकर्ते सुप्रीम कोर्टाच्या मुख्य गेटवर चढताना दिसत आहेत.
Hello world!!! PDM terrorist reached right outside Supreme Court of Pakistan and Islamabad police is facilitating them. #آئین_بچاؤ_پاکستان_بچاؤ #ZamanPark
pic.twitter.com/XJwegV1Q36— Hina Zainab (@hina98_hina) May 15, 2023
अनेक पाकिस्तानी नागरिकांनी हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी या आंदोलकांना थांबवलं पाहिजे तर ते त्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप युझर्सने केला आहे.