भारताची मिसाईल पडल्यानंतर पाकिस्तान ही उचलणार होतं हे मोठं पाऊल

भारताकडून चुकून मिसाईल फायर झाल्यानंतर पाकिस्तान देखील मोठ्या कारवाईच्या तयारीत होता. असा खुलासा झाला आहे.

Updated: Mar 16, 2022, 04:07 PM IST
भारताची मिसाईल पडल्यानंतर पाकिस्तान ही उचलणार होतं हे मोठं पाऊल title=

नवी दिल्ली : भारतीय सुपरसोनिक मिसाईल चुकून पाकिस्तानी भागात पडल्याचं प्रकरण अजून शांत झालेलं नाही. यामध्ये आता एक नवा खुलासा झाला आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, भारताच्या या मिसाईल दुर्घटनेनंतर पाकिस्तान भारताविरोधात कारवाई करणार होता. पाकिस्तान देखील उत्तर म्हणून त्याच क्षमतेची मिसाईल भारतावर डागणार होता. पण भारतीय मिसाईल पडल्यानंतर प्राथमिक चौकशीनंतर पाकिस्तानने हा निर्णय बदलला. (Pakistan had prepared to launch a similar missile in a retaliatory strike)

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, या प्रकरणाशी संबंधित लोकांचं मत आहे की, भारतीय मिसाईलला उत्तर देण्यासाठी पाकिस्तान देखील भारतावर मिसाईल सोडणार होता. पण हे चुकून झाल्याचं निदर्शनात आल्यानंतर पाकिस्तानने आपला निर्णय बदलला.

भारताकडून 9 मार्च रोजी एक मिसाईल पाकिस्तानच्या मियां चन्नू भागात जावून पडली. यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. पण काही घराचं थोडं नुकसान झालं. भारताकडून या घटनेवर खेद व्यक्त केला. मेंटनेन्स दरम्यान ही घटना घडली. भारताकडून याबाबत एक उच्चस्तरीय चौकशी देखील नेमण्यात आली आहे.

भारताकडून ही मिसाईल चुकून फायर झाल्यानंतर ही लगेच कोणतीही माहिती न मिळाल्य़ाने पाकिस्तानने (Pakistan) या घटनेबाबत एक ब्रिफिंग केलं. भारताने एका दिवसानंतर हे स्वीकारलं की, चुकून ही मिसाईल त्या भागात पडली.

पाकिस्तान सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी देशाच्या सैन्य मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, या घटनेनंतर पाकिस्तानची वायु सेना (Pakistan Air Force) भारताकडून येणाऱ्या मिसाईल ऑब्जेक्टवर लक्ष ठेवून होती.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी या प्रकरणात राज्यसभेत माहिती दिली. 'ही घटना चुकून घडली. सरकारने ही घटना गांभीर्याने घेतली असून याबाबत चौकशीचे आदेश ही दिले आहेत.'

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी ही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'आम्ही देखील भारताच्या या मिसाईलवर उत्तर देऊ शकलो असतो. पण आम्ही संयम बाळगला.'