कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर पाकिस्तानच्या भूमिकेत बदल, परराष्ट्रमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

पाकिस्तानच्या भूमिकेत का झाला इतका मोठा बदल...?

Updated: May 8, 2021, 06:08 PM IST
कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर पाकिस्तानच्या भूमिकेत बदल, परराष्ट्रमंत्र्यांचं मोठं वक्तव्य title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानच्या भूमिकेत मोठा बदल झाला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री महमूद कुरेशी यांनी आपल्या एका महत्त्वपूर्ण वक्तव्यात असे म्हटले आहे की, 'कलम 370 हटविणे ही काही अडचण नाही. ते म्हणाले की पाकिस्तानला याचा कधीच त्रास झाला नाही. ही भारताची अंतर्गत बाब आहे. पण पाकिस्तानला फक्त 35 ए काढून टाकल्याबाबत हरकत आहे.' (Pakistan Foreign Minister on Article 370)

कुरेशी म्हणाले की, पाकिस्तानला 35 ए याची चिंता आहे. ते म्हणाले की या संदर्भात पाकिस्तानने आपले मत यापूर्वीच स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे कुरेशी यांचे हे वक्तव्य त्यावेळी आले जेव्हा ते सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर रवाना झाले आहेत. सौदीला जाण्यापूर्वी त्यांनी हे विधान केले. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून आता याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

अनुच्छेद 370 वर पाकिस्तानचा यू-टर्न

कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानची भूमिका भारताविरूद्ध होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांसह सर्व आंतरराष्ट्रीय मंचांमध्ये भारताच्या या निर्णयाला विरोध केला. पण त्यावेळी भारताचा युक्तिवाद होता की अनुच्छेद 370 ही भारताची अंतर्गत बाब आहे. असे असूनही, आंतरराष्ट्रीय मंचांमध्ये पाकिस्तान जोरदारपणे हे प्रकरण उपस्थित करत आहे. आता कलम 370 च्या बाबतीत कुरेशी यांच्या विधानाने पाकिस्तानने यू-टर्न घेतले असं म्हणता येईल. पाकिस्तानमध्ये अशी बातमी आहे की काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी सौदी अरेबिया आणि युएई पाकिस्तानवर दबाव वाढवत आहेत. अनुच्छेद 370 बाबत पाकिस्तानची ही भूमिका सौदीचा दबाव असल्याचे मानले जात आहे.