वय वर्ष 51, जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट 25 वेळा सर करत नोंदवला विक्रम

नेपाळचे 52 वर्षीय कामी रिता शेर्पा यांनी शुक्रवारी 25 व्या वेळा जगातील सर्वात उंच पर्वत असलेला माउंट एव्हरेस्ट सर केला. अशाप्रकारे, त्यांनी सर्वात जास्त वेळा या पर्वत शिखरावर पोहोचण्याचा स्वतःचा विक्रम मोडला आहे. या पर्वतारोहण मोहिमेचे संयोजक, सेमिन समिट ट्रॅकचे अध्यक्ष मिंगमा शेर्पा यांनी सांगितले की, या मोहिमेमध्ये कामी रिता शेर्पा या 11 इतर शेर्पाचे नेतृत्व करीत होते. शुक्रवारी संध्याकाळी ही टीम यशस्वीरित्या माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचली. 

Updated: May 8, 2021, 04:08 PM IST
वय वर्ष 51, जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट 25 वेळा सर करत नोंदवला विक्रम title=

मुंबई : नेपाळचे 52 वर्षीय कामी रिता शेर्पा यांनी शुक्रवारी 25 व्या वेळा जगातील सर्वात उंच पर्वत असलेला माउंट एव्हरेस्ट सर केला. अशाप्रकारे, त्यांनी सर्वात जास्त वेळा या पर्वत शिखरावर पोहोचण्याचा स्वतःचा विक्रम मोडला आहे. या पर्वतारोहण मोहिमेचे संयोजक, सेमिन समिट ट्रॅकचे अध्यक्ष मिंगमा शेर्पा यांनी सांगितले की, या मोहिमेमध्ये कामी रिता शेर्पा या 11 इतर शेर्पाचे नेतृत्व करीत होते. शुक्रवारी संध्याकाळी ही टीम यशस्वीरित्या माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचली. 

कामी यांनी 2019 मध्ये 24 व्या वेळा हा पर्वत शिखर सर केला होता. 2019 मध्ये, ते महिन्यात दोनदा या माउंट एव्हरेस्ट शिखरावर चढण्यात यशस्वी झाले होते. त्यांनी प्रथम मे 1994 मध्ये माउंट एव्हरेस्ट शिखर सर केला होता. 

1994 ते 2021 दरम्यान कामी यांनी 25 वेळा माउंट एव्हरेस्ट सर केला. के2 आणि माउंट ल्होत्से एक-एक वेळा, माउंट मनास्लु तीन वेळा आणि माउंट चो आयु 8 वेळा सर केला आहे. 

गिर्यारोहकांना कोरोनाचा धोका

कोरोना महामारीमुळे जगभरात अराजक पसरले आहे, अशा परिस्थितीत चीन आणि नेपाळने पर्वतारोहणासाठी माउंट एव्हरेस्टवर पोहोचले आहे. आता अशी माहिती समोर येत आहे की बर्‍याच गिर्यारोहकांना कोरोना संक्रमण झाले आहे. अलीकडे अशा संक्रमित परदेशी लोकांना काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही गिर्यारोहकांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा कोरोना संसर्गाचे हे प्रकरण समोर आले.