अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप! 30 मिनिटांत सलग तीनवेळा धरणीकंप, 2,000 जणांचा मृत्यू

6.3 Magnitude Earthquake Hits Western Afghanistan: अफगाणिस्तान पुन्हा एकदा भूकंपाने हादरले आहे. या विनाशकारी भूकंपाने तब्बल दोन हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 8, 2023, 12:26 PM IST
अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप! 30 मिनिटांत सलग तीनवेळा धरणीकंप, 2,000 जणांचा मृत्यू title=
Over 2 000 dead in Afghanistan earthquake houses flattened

Afghanistan Earthquake: अफगाणिस्तान पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. तालिबानी प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या पश्चिमी भागात शक्तीशाली भूकंप झाला आहे. या भूकंपात जवळपास  दोन हजार नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येतेय. पश्चिम अफगाणिस्तानात ईराणच्या सीमेजवळ देखील भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. तर, भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी मोजण्यात आली आहे. 

भूकंपामुळं हेरात शहरापासून जवळपास 40 किमी (25 मील) दूर असलेल्या अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक इमारती कोलमडून पडल्या आहेत. तर, यामुळं शेकडो नागरिक मलब्याखाली सापडले आहेत. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे जवळपास तीन धक्के जाणवले होते. या विनाशकारी भूकंपातून वाचलेल्या लोकांनी हा अंगावर काटा येणारा अनुभव सांगितला आहे. त्यांनी सांगितले की, पहिल्या कार्यालयातील इमारती हलत असल्याचे जाणवले त्यानंतर काहीचवेळीत या इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या. 

देशातील सूचना व सांस्कृतिक मंत्रालयातील प्रवक्ता अब्दुल रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेरातमध्ये भूकंपात जीव गेलेल्या नागिरकांची संख्या मुळ आकड्यापेक्षा अधिक आहे. त्यांनी तात्काळ मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. या भूकंपात सहा गाव पूर्णपणे नष्ट झाली आहेत. तर, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एका वृत्तानुसार, 465 घर नष्ट झाले असून 135 घरांचे नुकसान झाले आहे. 

आपत्ती प्राधिकरणाचे प्रवक्ता मोहम्मद अब्दुल्ला जान यांनी सांगितले की, हेरात प्रांतातील जेंडा जान जिल्ह्यातील चार गावात भूकंपाचे हादरे जाणवले त्यानंतर सलग तीन वेळा भूकंपाचा धक्का जाणवला यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने नोंदवले की भूकंपाचा केंद्रबिंदू हेरात शहराच्या वायव्येस सुमारे 40 किलोमीटर अंतरावर होता. यानंतर सलग तीनवेळी भूकंपाचे तीन धक्के जाणवले याची तिव्रता 6.3, 5.9 आणि 5.5 इतकी होती. 

अफगाणिस्तानातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार,  घरे, कार्यालये आणि दुकाने सर्व खाली करण्यात आले आहेत कारण अधिक भूकंप होण्याची शक्यता आहे. जेव्हा मला भूकंपाचा धक्का जाणवला तेव्हा मी आणि माझे कुटुंब घरात होतो. तेव्हा माझ्या कुटुंबीयांनी आरडाओरडा सुरू केला आणि आम्ही घाबरुन घराबाहेर पडलो. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणमधील जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी 12 रुग्णवाहिका झेंडा जान येथे पाठवण्यात आल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक जखमींवर रुग्णालयात उपचार करत आहेत. अतिरिक्त गरजांचे मूल्यांकन करुन मदत करत आहेत.