Optical Illusion: Challange! अवघ्या 20 सेकंदात शोधा चित्रात दडलेल्या मांजरी

पाहणाऱ्याचे डोळे चक्रावून जातात. 

Updated: Sep 1, 2022, 12:02 PM IST
Optical Illusion: Challange! अवघ्या 20 सेकंदात शोधा चित्रात दडलेल्या मांजरी  title=
Optical Illusion IQ Test spot the cats

Optical Illusion IQ Test: आमची नजर साधीसुधी नाही... जे इतरांना दिस नाही ते आम्हाला दिसतं असं म्हणत हुशारकी मारणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. पण, अशाच बडेजाव मंडळींना जमिनीवर आणतं ते म्हणजे Optical Illusion. चित्र, रेषा, आकारऊकार, रंग या साऱ्याची अशी रचना या Optical Illusion मध्ये केलेली असते की पाहणाऱ्याचे डोळे चक्रावून जातात. 

चित्र पाहताना आपणच फिरतोय की काय असंही अनेकांना वाटतं. अशाच प्रकारात मोडणारं आणि निरीक्षण क्षमतेची परीक्षा पाहणारं एक चित्र सध्या प्रचंड व्हायरल झालं आहे. या चित्रात जे काही दडलंय ते शोधण्याचं Challange आम्ही तुम्हाला देत आहोत. (Optical Illusion IQ Test spot the cats)

ऑप्टिकल इल्यूजनच्या या चित्रात फक्त 1% पाहणारे 20 सेकंदांत अपेक्षित गोष्टी शोधण्यात यशस्वी ठरले आहेत. आता तुम्ही म्हणाल इतकं या चित्रात शोधायचंय तरी काय? 

तर, एखादं जुनं चित्र असावं अशा या फोटोमध्ये एक माणूस आणि एक स्त्री खुर्चीवर बसल्याचं दिसत आहे. त्यांच्याजवळच एक लहान मुलगीही दिसत आहे. एकंदर रचना पाहता हे त्यांचं घर असल्याचं लगेचच कळतंय. तर, तुम्हाला या फोटोमध्ये लपून बसलेल्या दोन मांजरी (Cats) शोधायच्या आहेत. 

व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला मांजर दिसेलही..... नजर चित्राच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरवा.. पाहा. 

optical Illusion

नाही सापडत? आम्ही सांगतो. पहिली मांजर चित्रात असणाऱ्या पुरुषाच्या पायाखाली दिसत आहे. तिथं ती निवांत झोपलेली दिसत आहे. तर, दुसरी मांजर महिलेपाशी, तिच्या कुशीत असल्याचं दिसत आहे. कळलं का कुठे दडलेल्या त्या मनीमाऊ?