नवी दिल्ली : मॉडेल एलिस इरविंगने आश्चर्यकारक दावा केला आहे. मॉडेलने म्हटले की, एका प्रसिद्ध अब्जाधीशसोबत ऑन कॅमेरा संबध ठेवण्यासाठी 7 लाख 90 हजार डॉलर म्हणजेच साधारण 6 कोटी रुपये ऑफर केले होते. ही ऑफर मॉडेलने धुडकावली आहे. कॅनडाच्या 24 वर्षीय मॉडेलने सांगितले की, एका नॉन डिस्कोजर एग्रीमेंटवर हस्ताक्षर करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला होता.
'द सन'च्या बातमीनुसार, ज्या व्यक्तीने मॉडेलला हे करण्याची ऑफर दिली आहे ती एक प्रसिद्ध व्यक्ती आहे. मॉडेलने म्हटले की, 'तो व्यक्ती मला भेटण्यासाठी उत्सुक होता आणि तसेच एकट्यात भेटण्याचाही प्रयत्न करीत होता. त्या व्यक्तीला माझ्याशी संबंध ठेवायचे होते. ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायचे होते. परंतू मला असे करायचे नव्हते. मी ती ऑफर नाकारली'. एवढी मोठी ऑफर नाकारण्याचे कारणही मॉडेलने सांगितले.
मॉडेलने सांगितले की ती पैशासाठी चुकीच्या गोष्टी करणार नाही. त्या व्यक्तीने एवढी मोठी ऑफर दिली होती तरीही! मॉडेलने सांगितले की, 'ऑफर मिळाल्यानंतर, तिने विचार केला की अशा गोष्टींसाठी पैसे घेतल्याने एक कलाकार म्हणून तिची किंमत कमी होईल आणि भविष्यात तिला काम शोधण्यात अडचणी येतील. या भीतीपोटी त्याने एवढी मोठी ऑफर नाकारली. अॅलिस इरविंगने सांगितले की, ती केवळ पैसा मिळतोय म्हणून चुकीचे काम करू शकत नाही'.