Omicron ने वाढवली जगाची चिंता; या देशात कम्युनिटी स्प्रेड सर्वाधिक

 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने कोरोना संसर्गाच्या नवीन प्रकार Omicron बद्दल चिंताजनक बाब स्पष्ट केली आहे.

Updated: Dec 15, 2021, 10:41 AM IST
Omicron ने वाढवली जगाची चिंता; या देशात कम्युनिटी स्प्रेड सर्वाधिक title=

मुंबई : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने कोरोना संसर्गाच्या नवीन प्रकार Omicron बद्दल चिंताजनक बाब स्पष्ट केली आहे. संस्थेने म्हटले आहे की नवीन वेरिएंटमुळे हॉस्पिटलायझेशन वाढू शकते तसेच मृत्यूचे प्रमाण वाढू शकते. आतापर्यंत 77 देशांमध्ये या प्रकाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

WHO चे महासंचालक टेड्रोस अधानम गेब्रेयस म्हणाले की, आतापर्यंत 77 देशांमध्ये ओमायक्रॉनची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. परंतु वास्तविकता अशी आहे, की त्याहूनही अधिक देशांमध्ये प्रकरणे आहेत. हे अद्याप माहित नाही. ओमायक्रॉन जितक्या वेगाने पसरत आहे तितक्या वेगाने आतापर्यंत कोणताही विषाणू पसरलेला नाही.

गेब्रेयसस असेही म्हणाले की, ओमायक्रॉनमुळे काही देशांनी त्यांच्या संपूर्ण प्रौढ लोकसंख्येला कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. तर या ओमायक्रॉन वेरिएंटवर बूस्टर डोसच्या प्रभावीतेचा कोणताही पुरावा नाही.

डब्ल्यूएचओ चिंतित आहे की, यामुळे कोरोना लसीची साठेबाजी वाढेल. ज्यांना गंभीर आजार आहेत. त्यांना बुस्टर डोस द्यायला हवे याकडे संस्थेने लक्ष वेधले. डब्ल्यूएचओ बूस्टरच्या विरोधात नाही. आम्ही विषमतेच्या विरोधात आहोत. आमची मुख्य चिंता सर्वांचा जीव वाचवणे आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

WHO ने एका निवेदनात म्हटले आहे की, जागतिक स्तरावर चिंतेच्या प्रकाराशी संबंधित प्रकरणांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, की हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूची संख्या वाढू शकते. 

Omicron आतापर्यंत 60 हून अधिक देशांमध्ये पसरला  

संस्थेने गेल्या आठवड्यात नवीन प्रकाराबद्दल अनेक तपशील दिले होते. यादरम्यान त्यांनी त्याचा प्रसार किती प्रमाणात होईल आणि त्यात नवीन वेरिएंटची संख्या सांगितली होती. 

नवीन वेरिएंटच्या घातक परिणामांबाबत तूर्तास तरी ठोस काही सांगणे घाईचे असल्याचेही WHO ने म्हटले आहे. नवीन प्रकार आतापर्यंत 60 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे.

कॅनडामध्ये ओमिक्रॉनचा प्रसार

Omicronचा कॅनडामध्ये कम्युनिटी स्प्रेड झाला आहे. कॅनडा मुख्य सार्वजनिक आरोग्य अधिकारी थेरेसा टॅमो यांनी ही माहिती दिली आहे.