झपाट्याने पसरतोय ओमायक्रॉन, आतापर्यंत इतक्या देशांमध्ये आढळले रुग्ण

डेल्टा वेरिएंटपेक्षा ओमायक्रान अधिक सांसर्गिक आहे का? संसर्ग वाढल्यास लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता किती आहे.?

Updated: Dec 8, 2021, 06:07 PM IST
झपाट्याने पसरतोय ओमायक्रॉन, आतापर्यंत इतक्या देशांमध्ये आढळले रुग्ण title=

मुंबई : कोरोनाचा नवीन प्रकार Omicron जगातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने बुधवारी म्हटले की, कोरोनाचा Omicron प्रकार आतापर्यंत 57 देशांमध्ये पोहोचला आहे. झिम्बाब्वेसह दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे रूग्णालयात दाखल झालेल्या संक्रमित लोकांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता आहे.

डेल्टा वेरिएंटपेक्षा ओमायक्रान अधिक सांसर्गिक आहे का? संसर्ग वाढल्यास लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता किती आहे.? मृत्यूच्या घटनांमध्ये किती वाढ होणार? WHO ने आपल्या साप्ताहिक अहवालात म्हटले आहे की, या सर्व प्रश्नांबद्दल जाणून घेण्यासाठी, Omicron प्रकारामुळे होणाऱ्या संसर्गाच्या तीव्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी अधिक डेटा आवश्यक आहे.

झिम्बाब्वेने उचलली कठोर पावले

दुसरीकडे, झिम्बाब्वे सरकारने ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे. ज्यांना अँटी-कोविड लस मिळालेली नाही त्यांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यापासून रोखण्यासाठी सरकारने कठोर योजना आखली आहे. सरकार म्हणते की, देशात कोविडविरोधी लसीकरणाचा दर वाढविला जाईल. एवढेच नाही तर विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी कडक नियम लागू केले जातील. झिम्बाब्वेने वर्षाच्या अखेरीस 60 टक्के लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

भारतात देखील ओमायक्रानचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे भारतासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशात चिंतेचं वातावरण आहे. भारतात सध्या परदेशातून येणाऱ्या लोकांची टेस्ट करुन त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे.