NSA अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा, चीनी सैन्य मागे सरकलं

भारत आणि चीन सीमा वादावर मोठी बातमी 

Updated: Jul 6, 2020, 05:32 PM IST
NSA अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा, चीनी सैन्य मागे सरकलं title=

नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमा वादावर मोठी बातमी आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री यांच्यात बैठक झाली. 5 जुलैला दोन तास ही चर्चा झाली. सीमेवर तणाव कमी करण्यासाठी ही चर्चा होती. दोन्ही देशांनी भविष्यात शांतता ठेवण्यासाठी सहमती दर्शवली.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, दोन्ही बाजुने यावर सहमती दर्शवली आहे की, नियंत्रण रेषेवर (LAC)तणाव संपवण्यासाठी लवकरच पाऊलं उचलण्यात येतील. दोन्ही बाजुने भारत-चीन सीमेवर तणावर कमी करण्यासाठी काम केलं पाहिजे. दोन्ही देशाच्या प्रतिनिधींनी शांतता कायम करण्यासाठी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. चर्चेदरम्यान एलएसीचा मान ठेवण्यासाठी सहमती दर्शवण्यात आली. भविष्यात सीमेवर तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न केले पाहिजे.'

लडाख सीमेवर असलेले चिनी सैन्य मागे सरकलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गलवान खोऱ्यातून सैन्य मागे सरकलं आहे. गलवानसह, हॉटस्परिंग, गोगरा येथे देखील चिनी सैन्य मागे गेलं आहे. 15 जूनला भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झडप झाली होती. ज्यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले होते. तर चीनचे देखील 40 हून अधिक सैन्य मारले गेले होते.

चीनने सैन्य मागे घेतलं असलं तरी भारतीय सैन्य अजूनही अलर्टवर आहे. भारतीय सैन्य अजून कमी करण्यात आलेलं नाही.