किम जोंगचा पुन्हा खोडसाळपणा, जपानच्या दिशेनं सोडलं क्षेपणास्त्र

उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उननं पुन्हा एकदा खो़डसाळपणा केलाय. उत्तर कोरियानं जपानच्या दिशेनं पुन्हा एकदा क्षेपणास्त्र डागलंय. 

Updated: Nov 29, 2017, 10:58 AM IST
किम जोंगचा पुन्हा खोडसाळपणा, जपानच्या दिशेनं सोडलं क्षेपणास्त्र title=

नवी दिल्ली : उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उननं पुन्हा एकदा खो़डसाळपणा केलाय. उत्तर कोरियानं जपानच्या दिशेनं पुन्हा एकदा क्षेपणास्त्र डागलंय. 

दक्षिण कोरियाई न्यूज एजेंसी आणि अमेरिकेने या बातमीला दुजोरा दिलाय. या क्षेपणास्त्राबाबतची माहिती अमेरिका घेत आहे. तसेच या संपूर्ण घटनेकडे लक्ष असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय.

यापूर्वी १५ सप्टेंबर आणि २९ ऑगस्टला उत्तर कोरियाने जपानवरून क्षेपणास्त्र डागली होती. तर दुसरीकडे उत्तर कोरिया २०१८ पर्यंत अणु क्षेपणास्त्र तयार करण्यास सक्षम होईल, असा दावा दक्षिण कोरियाने केलाय. त्यामुळे अमेरिकेचे धाबे दणाणलेत.