बापरे! अवघ्या 28 तासात उभारली 10 मजली इमारत, पाहा व्हिडिओ

तुम्ही असा कधी विचार तरी केला असावा का? तुम्हाला गोष्टीवर कदाचित विश्वास बसाणार नाही पण हे खरं आहे.

Updated: Jun 20, 2021, 03:41 PM IST
बापरे! अवघ्या 28 तासात उभारली 10 मजली इमारत, पाहा व्हिडिओ title=

चीन : या जगात काय घडेल याचा नेम नाही. दररोज नवनवीन रेकॉर्ड लोकं करत असतात. आजच्या घडीला अगदी कमी वेळात अशा काही अनोख्या वस्तू बनतात की, तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. साधारणत: इमारती बनण्यासाठी दोन किंवा तीन वर्षांचा काळ लागतो. परंतु अवघ्या 28 तासात 10 मजली इमारत बांधता येणे शक्य तरी आहे का? तुम्ही असा कधी विचार तरी केला असावा का? तुम्हाला गोष्टीवर कदाचित विश्वास बसाणार नाही पण हे खरं आहे.

चीनमध्ये हा कारनामा घडला आहे. एका प्रॉडक्शन कंपनीने अवघ्या 28 तास 45 मिनिटात शानदार 10 मजली इमारत उभारली आहे. सध्या या इमारतीचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. फक्त 5 मिनिटात तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण इमारत कशापद्धतीने बनली आहे समजते.

कंपनीने आपल्या यूट्यूब पेजवर हा टाईम लॅप्सचा व्हिडिओ शेअर केला आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही इमारत उभारण्यासाठी 'प्री-फॅब्रिकेटेड कंस्ट्रक्शन सिस्टम टेक्नॉलॉजी'चा वापर केला गेला आहे. याआधी एका ठिकाणी इमारतीचे वेगवेगळे भाग तयार करून घेतले. त्यानंतर ज्याठिकाणी इमारत उभी करायची आहे त्याठिकाणी ते भाग जोडून इमारत तयार केली गेली. यामुळे अशाप्रकारच्या इमारती कमी वेळात बनवणं शक्य झाले आहे.

या व्हिडिओला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात या टेक्नोलॉजीमुळे लोकांचा वेळ वाचेल असे कंपनीचे म्हणणे आहे.