हाफीज सईजने केला खुलासा : नवाज शरीफांना भोवली मोदींची मैत्री

  नजरकैदेतून सुटका झाल्यावर हाफीज सईजने हा खुलासा केलायं. 

Updated: Nov 24, 2017, 06:45 PM IST
हाफीज सईजने केला खुलासा : नवाज शरीफांना भोवली मोदींची मैत्री  title=

लाहोर :  नजरकैदेतून सुटका झाल्यावर हाफीज सईजने हा खुलासा केलायं. 

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड

हाफीज सईज हा २००८ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे.  
नवाज शरीफ यांनी भारतासारख्या शत्रूशी शांततेच्या वाटाघाटी केल्या. नवाज शरीफ हे देशद्रोही आहेत.  असं वक्तव्य हाफीज सईजने केलयं.  हाफीज सईजवर अमेरिकेने एक कोटींचं बक्षीस जाहीर केलयं. 

नवाज शरीफांमुळे नजरकैदेत

नवाज शरीफ पंतप्रधान असतांना हाफीज सईजला नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. भारतात याचं मोठ्या प्रमाणात स्वागत केल गेलं होतं. जुलै महिन्यात पाकिस्तानच्या सुप्रिम कोर्टाने भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन नवाज शरीफांना पदच्युत केलं होतं. 

पंतप्रधान पद का गेलं

"मला पदावरुन दूर का करण्यात आलं", असं शरिफांनी मला विचारलं. त्यावर
मोदींसारख्या हजारों मुस्लिमांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीशी मैत्री वाढवल्यामुळे हे घडलं, असं उत्तर आपण दिल्याचा खुलासा हाफीज सईजने केलायं.