डॉक्टर होण्याचं त्याचं स्वप्न अपूर्णच...युक्रेनमधील बॉम्ब हल्ल्यात मुलगा गमवलेल्या वडिलांना अश्रू अनावर

युक्रेन-रशियाच्या वादात भारतीय विद्यार्थ्याच्या गोळी लागून मृत्यू 

Updated: Mar 2, 2022, 12:26 PM IST
डॉक्टर होण्याचं त्याचं स्वप्न अपूर्णच...युक्रेनमधील बॉम्ब हल्ल्यात मुलगा गमवलेल्या वडिलांना अश्रू अनावर title=

मुंबई : युक्रेनमध्ये रशियाच्या सैनिकाकंडून सतत बॉम्बहल्ले होत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर जात आहे. रशियाकडून असा दावा केला जातोय की, युक्रेनच्या सैनिकांच्या ठिकाणांना टार्गेट केलं जात आहे. या दरम्यान सामान्य नागरिकांना जीव जात आहे. (Navin Shekhrappa father said sad but truth behind his son death in Ukraine )  युक्रेनमध्ये मेडिकलचं शिक्षण घेतल असलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा नवीन शेखरप्पाचा या गोळीबारात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

नवीन शेखरप्पा या युवकाचा मृत्यू झाल्यानंतर देशातील शिक्षणसंस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून एमबीबीएसच्या शिक्षणाकरता माझा मुलगा युक्रेनमध्ये आला होता, असं नवीन शेखरप्पा याच्या दुर्दैवी वडिलांनी सांगितलं. 

माझ्या मुलाला पीयूसीमध्ये ९७% मिळाले होते. एवढे गुण मिळूनही भारतात मेडिकलच्या शिक्षणाकरता जागा मिळाली नाही. त्यामुळे तो युक्रेनमध्ये शिक्षणाकरता गेला, असं नवीनच्या वडिलांनी सांगितलं. 

युक्रेनमधील खारकीव येथे रशियन गोळीबारात जीव गमावलेल्या नवीनच्या वडिलांनीही मेडिकलमध्ये जागा मिळविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतील, असे म्हटले आहे.

मात्र यापेक्षा कमी पैसा खर्च करून विद्यार्थी परदेशात शिक्षण घेतात. त्यामुळे ते येथे येतात, असं देखील ते यावेळी म्हणाले. 

विशेष म्हणजे खारकीववमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेतलेला कर्नाटकातील हवेली येथील नवीन शेखरप्पा हा रशियन गोळीबारात ठार झाला होता. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून नवीन याच्या मृत्यूची बातमी देण्यात आली. 

या घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी नवीनच्या वडिलांशी फोनवर संवाद साधला. पीडित कुटुंबाचं सांत्वन केलं. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी देखील सरकार नवीनचे शव युक्रेनमधून आणण्याचा प्रयत्न करेल असा शब्द दिला.