NASA : येत्या 16 तासात जगात कुठेही काहीही होऊ शकते... फेल झालेले सॅटेलाईट 21 वर्षानंतर पृथ्वीवर कोसळणार?

NASA  RHESSI Spacecraft : हा उपग्रह  273 किलो वजनाचा  आहे. हा उपग्रह समुद्रात पडल्यास कोणताही धोका नाही. मात्र, या उपग्रहाचे अवशेष मानवी वस्तीत कोसळल्यास मोठा विनाश होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. पृथ्वीच्या वातावरणाच प्रवेश करताना या उग्रहाचा बहुतांश भाग जळून जाईल. मात्र, याचे अवशेष इतरत्र कोसळू शकतात. 

Updated: Apr 18, 2023, 05:29 PM IST
NASA : येत्या 16 तासात जगात कुठेही काहीही होऊ शकते...  फेल झालेले सॅटेलाईट 21 वर्षानंतर पृथ्वीवर कोसळणार?     title=

NASA  RHESSI Spacecraft :  संपूर्ण जगाचे टेन्शन वाढणारी बातमी समोर आली आहे.  फेल झालेले NASA चे सॅटेलाईट 21 वर्षानंतर पृथ्वीवर कोसळणार आहे. येत्या 16 तासांत हे सगळं घडणार आहे. हे सॅटेलाईट  कोसळल्यानंतर पृथ्वीवर मोठा विशान होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. 19 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता हे सॅटेलाईट कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

NASA चा हा उपग्रह 21 वर्षांपूर्वी झेपावला होता

RHESSI स्पेसक्राफ्ट असे या उपग्रहाचे नाव आहे.  NASA चा हा उपग्रह 21 वर्षांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी 2002 मध्ये अवकाशात झेपावला होता. हा उपग्रह फेल झालेला असून सध्या अनियंत्रित स्थितीत आहे. हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत कोसळणार आहे. हा उपग्रह नेमका कधी आणि कुठे कोसळेल याबाबत शास्त्रज्ञांना देखील अंदाज लावणे कठीण झाले आहे. मात्र, 19 एप्रिल रोजी सकाळी सात वाजल्यापासून 16 तासांपूर्वी किंवा 16 तासांनंतर कधीही हा उपग्रह पृथ्वीवर कोसळू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मानवी वस्तीत उपग्रह कोसळल्यास मोठा विनाश होईल

हा उपग्रह  273 किलो वजनाचा  आहे. हा उपग्रह समुद्रात पडल्यास कोणताही धोका नाही. मात्र, या उपग्रहाचे अवशेष मानवी वस्तीत कोसळल्यास मोठा विनाश होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. पृथ्वीच्या वातावरणाच प्रवेश करताना या उग्रहाचा बहुतांश भाग जळून जाईल. मात्र, याचे अवशेष इतरत्र कोसळू शकतात. 

RHESSI स्पेसक्राफ्ट या उपग्रहाचे पूर्ण नाव Reuven Ramaty High Energy Solar Spectroscopic Imager असे आहे. हा उपग्रह आकाराने फार मोठा नाही. मात्र, याचे लहान अवशेष देखील मोठा विनाश घडवून आणू शकतात अशी भिती व्यक्त केली जात आहे. 

अवकाशाच्या कक्षेत सध्या अनेक उपग्रह फिरत आहे. यामुळे हा उपग्रह पृथ्वीच्या दिशेने कोसळत असताना अवकाशाच्या कक्षेतील इतर उपग्रहांची याच्यासह धडक झाल्यास धोका आणखी वाढू शकतो. युरोपियन स्पेस एजन्सीच्या म्हणण्यानुसार, 0.4 ते 4 इंचापर्यंतच्या दहा लाख वस्तू अवकाशात पृथ्वीभोवती फिरत आहेत. तसेच 1.30 कोटी हून अधिक अतराळ कचरा (स्पेस जंक) अवकाशता तरंगत आहे. 

सूर्य लहरींचा अभ्यास करत होते RHESSI स्पेसक्राफ्ट

RHESSI स्पेसक्राफ्ट हा उपग्रस नासाने सूर्य लहरींचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात सोडला होता. फेब्रुवारी 2002 मध्ये पेगासस XL रॉकेटच्या मदतीने RHESSI स्पेसक्राफ्ट अवकाशात झेपावले होते. सूर्यापासून निघणाऱ्या सौर लहरी आणि कोरोनल मास इजेक्शन यांचा अभ्यास करण्यासाठी हे सॅटेलाईट लाँच करण्यात आले होते.