पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांची भेट

भारत आणि चीनदरम्यान सिक्कीमवरून तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांची जर्मनीमध्ये भेट झाली. 

Updated: Jul 7, 2017, 07:46 PM IST
 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांची भेट title=

हॅम्बर्ग : भारत आणि चीनदरम्यान सिक्कीमवरून तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांची जर्मनीमध्ये भेट झाली. 

हॅम्बर्गमध्ये आजपासून सुरू झालेल्या जी 20 परिषदेनिमित्त हे दोन्ही नेते समोरासमोर आले. दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन करून अभिवादन केलं. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गोपाळ बागलाय यांनी ट्विटरवरून या भेटीबाबत माहिती दिलीये. जी-20 परिषदेच्या निमित्तानं ब्रिक्स देशांच्या नेत्यांचीही बैठक झाली. यावेळी मोदी आणि जिनपिंग यांची भेट झाली. 

वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची द्विपक्षीय चर्चा चीननं टाळली असली तरीही दोन्ही नेत्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केल्याचंही बागलाय यांनी ट्विट केलं आहे.