नेतन्याहू यांच्याकडून नमस्ते म्हणत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा (व्हिडीओ)

 बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

Updated: Aug 15, 2019, 07:57 PM IST
नेतन्याहू यांच्याकडून नमस्ते म्हणत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा (व्हिडीओ)  title=

नवी दिल्ली : भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या नागरिकांना नमस्ते म्हणत शुभेच्छा दिल्या. नेतन्याहू यांनी ट्वीट करुन भारत आणि इस्त्रायलच्या मैत्रीचा दाखला देणारा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. बेंजामिन यांनी हे ट्वीट हिंदीतून केले आहे. या ट्वीटनंतर भारत आणि इस्त्रायल यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ झाले आहेत. 

बेंजामिन नेतन्याहू यांच्या या शुभेच्छांच्या ट्वीटचे महत्त्व फार आहे. २३ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये भारत आणि इस्त्रायलच्या संबंधांबद्दल बोलण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या भेटींदरम्यानचे क्षण देखील यामध्ये दिसून येत आहेत. 

इस्त्रायलमध्ये झालेल्या निवडणुकांदरम्यान पंतप्रधान मोदी आणि स्वत:च्या फोटोंचे होर्डींग प्रचारासाठी इमारतींवर लावले होते. बेंजामिन नेतन्याहू हे इस्त्रायलमध्ये सर्वाधिक वेळ कार्यरत असलेले पंतप्रधान ठरले आहेत. याआधी या किर्तीवंत देशाचे संस्थापक डेविड बेन गुरियन यांचे नाव होते. इस्त्रायलचा जन्म होऊन २५ हजार ९८१ दिवस झाले आहेत. यामधील ४ हजार ८७३ दिवसांपर्यत ते पंतप्रधानपदी आहेत.