बौद्ध मंदिराखाली सापडला प्राचीन खजिना; 2000 वर्षांपूर्वीची नाणी अन् त्यावर...

Trending News In Marathi: पाकिस्तानातील बौध्द स्तुपाखाली प्राचीन खजिना सापडला आहे. पुरातत्वविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा खजिना शोधला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 3, 2023, 02:01 PM IST
बौद्ध मंदिराखाली सापडला प्राचीन खजिना;  2000 वर्षांपूर्वीची नाणी अन् त्यावर... title=
Mysterious Treasure Of 2000 Years Old Coins Found Buried Under Buddhist Temple Of Pakistan

Trending News In Marathi: जगभरातील विविध प्रांतात अनेक राजां-महाराजांनी राज्य केले. त्याचे पुरावे आणि अवशेष अजूनही आपल्याला पाहायला मिळतात. पण आजही अशा अनेक गोष्टी आणि इतिहासातील पुरावे आहेत जी काळाच्या ओघात जमिनीखाली गाडले गेले आहेत. आज अनेक ठिकाणी इतिहास जाणून घेण्यासाठी उत्खननाचे काम जोमाने केले जाते. अनेकदा खोदकामात दुर्लभ अवशेष सापडले जाताता किंवा प्राचीन खजिना सापडला जातो. असा खजिना साधारणतः जमिनीखाली दफन केलेले असतात किंना समुद्राच्या तळाशी आढळतात. असाच एक प्रकार अलीकडे पाकिस्तानान समोर आला आहे. 2000 वर्ष जुने प्राचीन नाणी सापडली आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच पाकिस्तानात 2000 वर्ष जुने प्राचीन नाण्यांचा खजिना सापडला आहे. पुरातन बौद्ध मंदिर म्हणजेच ज्याला स्तूपदेखील म्हटले जाते. त्यांखाली असलेल्या दुर्गम भागात हा खजिना सापडला आहे. लाइव्हसायन्सच्या एका रिपोर्टनुसार, हा खजिना पुरातत्वविभागाच्या दक्षिणपूर्व पाकिस्तानमध्ये असलेले प्राचीन स्थळ मोहोनजोदाडो (Mohenjo-Daro) येथे असलेल्या एका बौद्ध मंदिराच्या खाली सापडले आहेत. हे बौद्ध मंदिर जवळपास 2600 ईसवी सन पूर्वीचे आहे. 

पुरातत्वविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या खोदकामात हा प्राचीन खजिना सापडला आहे. 5.5 किलोग्रॅम असलेले हे नाणे तांबे या धातूचे असून हिरव्या रंगाचे आहेत. या नाण्यांची संख्या 1000 ते 1500 सांगितली जात आहे. यातील काही नाण्यांवर एक आकृती असल्याचेही सांगण्यात येत आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ही नाणी कुषाण राजा यांच्या कार्यकाळातील असू शकतात. अलीकडेच सापडलेला हा खजिना कुषाण काळातील असल्याची शक्यता पुरातत्वविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कारण कुषाण साम्राज्याच्या कार्यकाळात बौद्ध धर्माचा प्रसार अधिक झाला होता. 

पुरातत्वविभाग आणि गाइज शेख जावेद अली सिंधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 1600 वर्षांनंतर पुरतन अवशेषांवर बौद्ध स्तुप बांधण्यात आले होते. खोदकामात सापडलेल्या नाण्यांना आर्कियोलॉजीकल प्रयोगशाळेत सावधानीपूर्वक साफ करण्यात येणार आहे. हे नाणी सापडल्यामुळं पुरातत्वविभागाच्या अधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. या नाण्यांच्या माध्यमातून इतिहासाचा अधिक शोध घेण्यात येण्यास मदत होईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.