बेपत्ता झालेला मुलगा 8 वर्षांनतर सापडला; लैंगिक गरज भागवण्यासाठी आईने केले होते कैद

जन्मदात्या आईनेच आपल्या तरुण मुलाला लैंगिक गुलाम बनवले होते. आई तब्बल 8 वर्ष या मुलावर लैंगिक अत्यार करत होती. 

Updated: Jul 12, 2023, 10:45 PM IST
बेपत्ता झालेला मुलगा 8 वर्षांनतर सापडला; लैंगिक गरज भागवण्यासाठी आईने केले होते कैद  title=

Crime News : बेपत्ता झालेला मुलगा 8 वर्षांनतर सापडला आहे. मात्र, हा मुलगा आठ वर्षे कुटे गायब झाला होता हे समजल्यावर पोलिसांना देखील धक्का बसला आहे. कारण, या मुलाचे अपहरण त्याच्या जन्मदात्या आईनेच केले होते. जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलाला लैंगिक गुलाम (sex slave) बनवले होते.  लैंगिक गरज भागवण्यासाठी आईने मुलाला कैद करुन ठेवले होते. टेक्सासमध्ये ही घटना घडली आहे. 

2015 मध्ये झाला होता बेपत्ता 

8 वर्षांपूर्वी एक 25 वर्षांचा मुलगा अचानक बेपत्ता झाला होता. तो आपल्या दोन कुत्र्यांना फिरायला घराबाहेर पडला आणि अचानक गायब झाला. 2015 मध्ये तो बेपत्ता झाला होता.  आता तो सापडला आहे. त्याच्या बेपत्ता होण्यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे.  मिरर यूकेने याबाबतच वृत्त दिले आहे.

8 वर्ष हा मुलगा कुठे होता?

वयाच्या 17 वर्षी हा मुलगा बेपत्ता झाला होता. आठ वर्षानंतर म्हणजे वयाच्या 25 व्या वर्षी हा मुलगा एका चर्चमध्ये अत्यंत दयनीस अवस्थेत सापडला. या तरुणाच्या आईनेच त्याचे अपहरण करुन त्याला कैद करुन ठेवले होते असा दावा एका स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे.  

आई करत होती लैंगिक शोषण

6 मार्च 2015 रोजी हा तरुण बेपत्ता झाला होता. यानंतर त्याच्या आीने पोलिसात तक्रार केली नाही किंवा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. या मुलाच्या नातेवाईकांकडून तो बेपत्ता झाल्याचे समजले. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार हा मुलगा बेपत्ता झाला होता. त्याच्या आईनेच सर्व नातेवाईंकाना मुलगा बेपत्ता झाला असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र, आईनेच मुलाला घरात कैंद करुन ठेवले होते. पतीच्या निधनानंतर या महिलेने मुलालाच लैंगिक गुलाम बनवले होते. घरात एका खोलीत तीने मुलाला कैद करुन ठेवले होते. आईने मला पती आणि वडिलांची भूमिकेत माझ्यासोबत राहा असे मला सांगितले. आई माझा लैंगिक छळ करत होती असे या तरुणाने पोलिसांना सांगितले.  अनेक वर्ष घरात कैद राहिल्यामुळे या मुलगा नैराश्यात गेला आहे. तसेच त्याच्या आईनेच त्याला लैंगिक गुलाम बनवल्यामुळे त्याला मोठा मानसिक धक्का देखील बसला आहे.