मुंबई : घरात लहान मूल आलं की घरात अगदी आनंदाचं वातावरण निर्माण होतं. केवळ घरातच नव्हे तर आजूबाजूला राहणारे नातेवाईक देखील खूश होतात. मात्र तुम्हाला चीनमधील एका विचित्र परंपरेबद्दल माहिती आहे का? यामध्ये बाळाच्या जन्मानंतर आई गर्भनाळ खाऊन टाकते? हे खरं आहे..तर जाणून घेऊया चीनमध्ये असं का करतात..
चीनमध्ये याला प्लेसेंटोफॅगी असं म्हटलं जातं. लोकं असं मानतात की, प्लेसेंटामध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे महिला याला खातात. यामुळे अनेकदा बाळाच्या जन्मानंतर आई स्वतःची गर्भनाळ खाते.
इतकंच नाही तर अनेकदा गर्भनाळ रूग्णालयातून चोरीही केली जाते. यानंतर बाहेर याला मोठ्या किंमतीत विकली जाते. चीनमध्ये प्लेसेंटाला औषधाप्रमाणे जास्त किमतीत विकली जाते. प्लेसेंटा सुकल्यानंतर औषधाप्रमाणे वापरली जाते. तर काही लोकं याचं सूप तयार करून सेवन करतात.
टेक्सास युनिव्हर्सिटी रूग्णालयाच्या डॉक्टरांनी हे खाल्ल्याने होणाऱ्या नुकसानाविषयी माहिती दिली आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, यामध्ये व्हायरस असू शकतात. प्लेसेंटा फिल्टर करून आईपासून मुलापर्यंत पोषण प्रसारित करते. म्हणून, त्यात धोकादायक जीवाणू आणि विषाणू लपलेले असू शकतात, जे खाल्ल्याने आजार जडू शकतात.
2016 मध्ये, सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशनने, प्लेसेंटा खाण्याविषयी एक संशोधन केलं होतं. ज्यामध्ये धक्कादायक तथ्य समोर आलेलं. हे संशोधन एका आईवर करण्यात आलं होतं. जिच्या मुलाच्या रक्तात आधीच गंभीर संसर्ग होता. असं झालं कारण मुलाच्या जन्मानंतर जेव्हा आई प्लेसेंटाने बनवलेली कॅप्सूल खाल्ली होती. ही महिला बाळाला दूध पाजायची आणि यामुळे हा संसर्ग मुलापर्यंत पोहोचला.