मुंबई: सोशल मीडिया हा माहिती आणि प्रसिद्धीचा एक मोठाच स्त्रोत. तसेच, तुमच्यातील कला, गुणांना वाव मिळवून देणारे मोठे व्यासपीठ. ज्यामुळे तुम्ही एकाच वेळी असंख्य लोकांसमोर जाताच पण, रातोरात स्टारही होता. आता, हीच परीराणी पाहा ना. सोशल मीडियावर व्हायरल झालेले या छोट्याशा परीराणीचे फोटो पाहून अनेकज आश्चर्यचकित होतात. अनेकांचे म्हणने असे की, हा एक फोटो आहे तर, काहींचे म्हणने असे की, हे एक पेंटींग आहे. काहींनी तर ही प्रतिमा फोटोशॉप्ड असल्याचेही म्हटले. पण, जेव्हा सत्यता पडताळून पाहिले तेव्हा ही प्रतिमा खरोखरच फोटो आहे. हा फोटो आहे एका पाच वर्षांच्या मुलीचा. जो पाहून तुम्ही म्हणाल 'वाह...! क्या बात हैं..', '..अतिसुंदर'.
सोशल मीडियावर फोटोच्या रूपात व्हायरल झालेल्या या मुलीचे नाव आहे जेरे इजालाना (Jare Ijalana). तुमची नजर जेव्हा या फोटोवर पडते तेव्हा प्रथमदर्शनी हा एखादा पुतळाच असावा असे भासते. सोशल मीडियावर अनेकांनी हिचे वर्णन परीराणी असेच केले आहे. सावळा वर्ण आणि चमकदार डोळे पाहताक्षणीच लक्ष वेधून घेतात.
प्रसिद्ध छायाचित्रकार मोफ बामुयवा (Mofe Bamuyiwa)याने हे फोटो जेरे इजालाना (Jare Ijalana)मोफ बामुयवाने हे फोटो ट्विटरवर आणि इन्स्टाग्रामवर शेअऱ केले आहेत. तसेच, त्याखाली‘ओह! ती एक मनुष्य आहे…ती एक परी आहे’, असे कॅप्शन दिले आहे.